---Advertisement---

विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियासाठी ही आहे आनंदाची बातमी

On: शनिवार, जून 1, 2019 11:04 AM
---Advertisement---

विश्वचषक 2019 स्पर्धेत आज(1 जून) दुसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघात होणार आहे. या दोन्ही संघांचा 2019 च्या विश्वचषकातील हा पहिलाच सामना आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला फिट घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा दिलासा मिळाला आहे.

वॉर्नरला काही दिवसांपूर्वी स्नायूंचा ताण जाणवत होता. पण त्याने फिटनेस टेस्ट पार केली असून तो आज होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. याबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने माहिती दिली आहे.

आज होणाऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना फिंच म्हणाला, ‘वॉर्नर उद्याचा(1 जून) सामना खेळण्यासाठी फिट आहे.’

असे असले तरी फिंचने अंतिम 11 मधील खेळाडूंबाबत खूलासा केलेला नाही. तो म्हणाला, ‘अंतिम 11 खेळाडूंसाठी नाणेफेकी पर्यंत वाट पहावी लागेल. सर्वजण जेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये असतात तेव्हा स्पर्धेच्या सुरुवातीला अंतिम 11 चा निर्णय घेणे कठिण असते.’

वॉर्नर या सामन्यासाठी उपलब्ध असल्याने आता ऑस्ट्रेलियाकडून सलामीला फिंच आणि वॉर्नर येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांच्यातील कोणता फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर उतरणार हे पहावे लागणार आहे. या प्रश्नावर निर्णय घेऊ हे देखील फिंचने स्पष्ट केले आहे.

याबरोबरच फिंचने सांगितले की ‘ संघातील प्रत्येक खेळाडू चेंडूवर चांगला प्रहार करत असून गोलंदाजही चांगल्या लयीत आहेत. ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. कोणत्याही वेळी कोणालाही संधी दिली तर तो त्या संधीचा पूर्ण फायदा घेत आहे. त्याचमुळे संघाची निवड करणे सोपे नाही. पण ही चांगली गोष्ट आहे की संघातील सर्व खेळाडू फॉर्ममध्ये आहेत.’

या विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाने त्यांचे दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. तसेच त्यांच्याकडून आजच्या सामन्यातून वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पूनरागमन करणार आहेत.

त्यांच्यावर मागीलवर्षी मार्चमध्ये चेंडू छेडछाड प्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 1 वर्षांची बंदी घातली होती. या बंदीचा कालावधी पूर्ण झाला असून आता वॉर्नर आणि स्मिथ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूनरागमन करण्यास सज्ज झाले आहेत.

आज 2019 विश्वचषकात 2 सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान हा आजचा दुसरा सामना असणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.00 वाजता सुरुवात होणार आहे. आजचा पहिला सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका संघात होणार आहे. हा सामना दुपारी 3 वाजता सुरु होईल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

तुफानी फॉर्ममध्ये असणाऱ्या ख्रिस गेलचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच आहे विश्वचषकातील षटकार किंग, जाणून घ्या कारण

प्रतिस्पर्धी खेळाडूंना धावबाद करण्यासाठी टीम इंडिया करतीय कसून सराव, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment