साउथँम्पटन। 2019 विश्वचषकाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. या विश्वचषकात भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथँम्पटनला होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या साउथँम्पटनमध्ये असून या सामन्याची तयारी करत आहेत.
भारतीय संघाच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये भारतीय संघ क्षेत्ररक्षणाचा सराव करत आहे. यामध्ये त्यांनी स्टंम्पवर थेट चेंडू मारण्याचा सराव केलेला दिसतो.
हा सराव भारतीय संघाकडून करुन घेताना भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांनी काही नवीन कल्पना वापरल्या आहेत. याबद्दलही त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
श्रीधर यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले की ‘आमचे आज चांगले क्षेत्ररक्षणाच्या सरावाचे सत्र पार पडले. हा सराव चेंडू थेट स्टंम्पवर मारण्याचा होता.’
‘यामध्ये आम्ही नॉन स्ट्रायकर एन्डवर लक्ष केंद्रित केले होते. आम्ही राउंड द क्लॉक या सराव प्रकाराने सुरुवात केली. ज्यामध्ये आम्ही 6 वेगवेगळ्या क्षेत्ररत्रणाच्या जागा ठेवल्या होत्या. तेथून खेळाडूंना 20 वेळा स्टंम्पवर चेंडू मारायचा होता.’
या क्षेत्ररक्षणाच्या सराव सत्रात खेळाडूंना काही तांत्रिक बाबीही समजावण्यात आल्याचे श्रीधर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘सरावानंतर आमचे तांत्रिक बाबींचे सत्र झाले. ज्यात मला खेळाडूंना स्टंम्पवर चेंडू मारताना हाताची योग्य स्थिती असण्याचे महत्त्व समजवण्याची संधी मिळाली. त्यानंतर आम्ही एक छोटा खेळ खेळला. ज्यामध्ये खेळाडूंना स्टंम्पवर चेंडू मारायचा होता.’
‘ज्यांना स्टंम्पवर चेंडू मारता आला नाही त्यांनी पुन्हा पुन्हा परत येऊन यासाठी प्रयत्न केले. अखेर आमचा एकच खेळाडू स्टंम्पवर चेंडू मारु शकला नाही…त्यामुळे खेळाडू जमिनीवर लोळून हसत होते आणि ही एक मजा होती. पण मुख्य गोष्ट होती की खेळाडूंना चेंडू स्टंम्पवर थेट मारण्याबद्दल काही तांत्रिक माहिती देणे.’
What's happening in @coach_rsridhar's new fielding drill? Find out here ???????? #TeamIndia #CWC19 pic.twitter.com/y3Ffc60PVW
— BCCI (@BCCI) May 30, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–Video: विराट करतोय गोलंदाजीचा सराव, चाहत्यांनी दिला खास सल्ला
–विश्वचषक २०१९: आज होणाऱ्या विंडीज विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा असा आहे इतिहास
–बेन स्टोक्सने केली विश्वचषकातील तब्बल २३ वर्षांपूर्वीच्या मोठ्या पराक्रमाची बरोबरी




