दुबईच्या मैदानावर मंगळवारी (२७ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला ८८ धावांनी पराभूत केले. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाच्या मांडीला दुखापत झाली. पण त्याची ही दुखापत जास्त गंभीर नसल्याचे म्हटले जात आहे. तरी तो पुढील काही सामन्यात खेळणार नसल्याची चर्चा चालू आहे.
कारण हैदराबाद संघ आधी बीसीसीआयच्या मेडिकल टीमशी साहाच्या दुखापतीविषयी सल्लामसलत करणार आहे. त्यानंतर त्याला पुढील सामन्यात खेळवण्यात येईल का नाही?, यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. कारण काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या भारतीय कसोटी संघात साहाला संधी दिली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंच्या दुखापतीवर बीसीसीआयची मेडीकल टीम जास्त लक्ष देत आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलताना हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने साहाच्या दुखापतीबद्दल माहिती दिली होती. तो म्हणाला होता की, “दुर्दैवाने सामन्यादरम्यान साहाच्या मांडीला दुखापत झाली. त्यामुळे पुढे दिल्लीच्या डावामध्ये तो यष्टीरक्षणासाठी नाही आला. त्याच्याऐवजी श्रीवत्स गोस्वामीने यष्टीरक्षण केले होते. अपेक्षा करतो की, साहाची दुखापत जास्त गंभीर नसावी.”
तसेच बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “आम्ही आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल जास्त सतर्क राहायला सांगितले आहे. साहाची दुखापत सध्या तरी जास्त गंभीर दिसत नाही. तसेच हैदराबादच्या पुढील सामन्यासाठी अजून ३ दिवसांचा कालावधी आहे. आम्ही अपेक्षा करतो की, तेव्हापर्यंत त्याची दुखापत बरी होईल. तरी त्याला पुढील २ सामन्यांमध्ये विश्रांती देण्याची शक्यता आहे.”
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात साहाने आक्रमक फलंदाजी करत ४५ चेंडूत ८७ धावा केल्या होत्या. यात त्याच्या १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘काही लोकांसाठी मुंबई म्हणजेच सर्वकाही,’ पाहा कुणावर साधला श्रीकांत यांनी निशाणा
विकेटकीपर रिषभ पंतला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून का मिळाला डच्चू?, माजी क्रिकेटरने दिले स्पष्टीकरण
रोहित आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकणार? अखेर फिजिओने सादर केला मेडिकल रिपोर्ट
ट्रेंडिंग लेख-
Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय
SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर