सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत सोमवार, 31 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात आमना सामना झाला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि मोठी धावसंख्या देखील उभी केली. परंतु त्यांचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर मात्र पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात वॉर्नरची बॅट पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये शांत दिसली आहे. सोमवारी तो पुन्हा एकदा एक आकडी धावसंख्येवर हाद झाला.
ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यातील हा सामना ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियवर खेळला गेला होता. टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मधील हा 31 वा सामना खेळला गेला होता. आयर्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रलियाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागली. परंतु ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या प्रदर्शनावर नाणेफेकीचा काहीही परिणाम झाल्याचे दिसले नाही. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 179 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात मोठी धावसंख्या केली असली असली, तरी सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरला. वॉर्नरने टी-20 विश्वचषकच्या चालू हंगामात आतापर्यंत तीन सामने खेळले, ज्यामध्ये अवघ्या 19 धावांचे योगदान तो संघासाठी देऊ शकला आहे. यादरम्यान 11 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. त्याने या तीन सामन्यांमध्ये फक्त एकदाज दोन आकडी धावा केल्या आहेत. मागच्या वर्षी वॉर्नने टी-20 विश्वचषकात जबरदस्त प्रदर्शन करून संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. त्याला प्लेअर ऑफ द सीरीज देखील निवडले गेले होते. परंतु यावर्षी मात्र त्याची बॅट खूपच शांत आहे.
टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने न्यूझीलडंसोबत खेळला होता. या सामन्यात वॉर्नरने पाच धावांवर विकेट गमावली होती. ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना श्रीलंका संघासोबत होता, ज्यामध्ये वॉर्नरने 11 धावा केल्या. आता सोमवारी आयर्लंडविरुद्ध त्याने अवघ्या तीन धावांवर विकेट गमावली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: आयर्लंडच्या गोलंदाजाविरुद्ध मार्शचा धोबीपछाड षटकार; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘बापरे!’
रिषभ पंतने ओपनिंग केल्यानंतर बदलणार भारताचे नशीब; असं आम्ही नाही, तर पठ्ठ्याचा चाहताच म्हणतोय