श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला चौथा वनडे सामना नाट्यमय राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४९ षटकात २५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ २५४ धावांवर सर्वबाद झाला आणि श्रीलंकेने ४ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. यासह एका नकोशा विक्रमाच्या यादीत त्याचे नाव जोडले गेले आहे.
श्रीलंकेच्या (Sri Lanka vs Australia) २५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर वॉर्नरने (David Warner) ११२ चेंडू खेळताना १२ चौकारांच्या मदतीने ९९ धावा केल्या. शतकापासून फक्त एका धावेने दूर असताना श्रीलंकेच्या धनंजय डी सिल्वाने यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाच्या हातून त्याला यष्टीचीत केले. यासह वनडे क्रिकेटच्या इतिहासात वॉर्नर ९९ धावांवर यष्टीचीत (David Warner Stumped On 99 Runs) होणारा जगातील केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे.
वॉर्नरपूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांच्याबाबतीत असे घडले होते. लक्ष्मण वर्ष २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ९९ धावांवर यष्टीचीत झाले होते.
Heartbreak for David Warner!
He misses out on his 💯 by 1 run.
Watch the #SLvAUS series on https://t.co/WngPr152Th (in select regions) 📺
📝 Scorecard: https://t.co/KsvSxzygVs pic.twitter.com/NMowbjFJ20
— ICC (@ICC) June 21, 2022
ठरला तिसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज
याखेरीज वॉर्नर वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ९९ धावांवर बाद होणारा केवळ तिसराच फलंदाजही ठरला आहे. वॉर्नरपूर्वी मॅथ्यू हेडन वर्ष २००१ मध्ये भारताविरुद्ध तर ऍडम गिलख्रिस्ट वर्ष २००३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक करण्यापासून एका धावेने हुकला होते. तसेच वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ९९ धावांवर बाद होण्याचा नकोसा विक्रम माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिन त्याच्या वनडे कारकिर्दीदरम्यान ३ वेळा ९९ धावांवर बाद झाला होता.
पूर्ण केल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १६ हजार धावा
याबरोबरच वॉर्नरने त्याच्या ९९ धावांच्या खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १६ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तो ऑस्ट्रेलियाकडून १६ हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा सहावा फलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने केल्या आहेत. त्याने एकूण २७३६८ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा तळपली सरफराज खानची बॅट, रणजीच्या अंतिम सामन्यात शतक ठोकत द्रविड-लक्ष्मणला सोडले मागे
महिला सुपर सिक्समध्ये पुणेरी वॉरियर्सची विजयी सलामी