ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभाग घेण्याचा त्याचा कसलाही विचार नाहीय. ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत वॉर्नरने सांगितले की, सामन्यतः पीएसएलचे वेळापत्रक आणि ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकातील सामने एकाच वेळी येत असतात. त्याच कारणास्तव पाकिस्तानमध्ये येणे आणि खेळणे अशक्य आहे.
पीएसएलचे आयोजन पाकिस्तान क्रिकेटच्या अंतर्गत केले जाते. नुकताच्या पीएसएलचा हंगाम संपला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात सुरु असलेली मालिका सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानचे जवळपास सर्व खेळाडू पीएसएलमध्ये खेळत होते. यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दिग्गजांचाही समावेश होता. पाकिस्तानमध्ये जाण्याआधी डेविड वॉर्नर (David Warner) याने मैदानातील अनोख्या अंदाजाने चाहत्यांची मने जिंकली होती. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पाकिस्तानी चाहत्यांशी जोडले जाण्याविषयी प्रश्न विचारल्यावर वॉर्नर म्हणाला की, “चाहते खेळाचा एक महत्वाचा भाग आहेत आणि खेळताना त्यांना व्यस्त ठेवणे खूप गरजेचे आहे. वॉर्नर म्हणाला की, मी प्रत्येकाला आनंदी ठेव इच्छितो आणि हाच माझा नेहमी प्रयत्न राहिला आहे. चाहत्यांसोबत मी जोडला जातो आणि माझ्या खेळात ते नेहमी महत्वाचा भाग असतात. ते याठिकाणी येऊन आम्हाला समर्थन करतात. आम्ही चांगले प्रदर्शन करून त्यांचे मनोरंजन केले, तर ते सपोर्ट करतात. मला त्यांच्यासोबत सामील व्हायला आवडते.”
दरम्यान, पाकिस्तान दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात डेविड वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. क्षेत्ररक्षणावेळी तो मैदानात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला होता. चाहतेही वॉर्नरच्या या अंदाजाला दाद देत होते. पहिल्या कसोटी सामन्यात खेळपट्टी सपाट होती आणि फलंदाजांसाठी फायदेशीर ठरली. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघातील फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आणि सामना अनिर्णीत राहिला. उभय संघातील दुसऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या –
WIvENG| पहिल्या कसोटीत यजमान विंडीज फ्रंटफूटवर; बोनरचे अफलातून शतक
रावळपिंडी कसोटीतील खेळपट्टीमूळे पुन्हा पाकिस्तानची नाचक्की; आयसीसीनेही केली कारवाई
दुसऱ्या कसोटीपूर्वी वॉर्नरने दिली महत्वाची प्रतिक्रिया; खेळपट्टीबाबत म्हणाला…