---Advertisement---

कोहलीची प्रशंसा करणार्‍या पोस्टवर डेव्हिड वॉर्नरने दिला ‘हा’ भन्नाट रिप्लाय

On: रविवार, मे 23, 2021 8:56 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील एक अव्वल फलंदाज आहे, यात काही शंका नाही. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो अतिशय बहारदार फलंदाजी करतो. प्रत्येक प्रकारानुसार आपल्या फलंदाजीत बदल करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. याच कारणामुळे आजच्या घडीला तो जागतिक क्रिकेटवर राज्य करतो आहे, असे म्हणायला हरकत नाही.
हेच वास्तव अधोरेखित करणारी एक पोस्ट नुकतीच स्पोर्ट्सकीडा या क्रीडा संकेतस्थळाने केली होती. कोहलीच्या कामगिरीचा यात उल्लेख केला होता. ज्यावर ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एक भन्नाट रिप्लाय दिला आहे.

डेव्हिड वॉर्नरच्या रिप्लायने जिंकली चाहत्यांची मने
कोहली विद्यमान क्रिकेट जगतातील एक अव्वल फलंदाज तर आहेच. पण तो सार्वकालीन महान फलंदाजांपैकी एक आहे, असेही आपण म्हणू शकतो. त्याचे आकडेच याची साक्ष देतात. विराट कोहलीची तिन्ही प्रकाराच्या क्रिकेट मधील सरासरी ५० पेक्षाही अधिक आहे. टी२० क्रिकेटमध्ये तो आजच्या घडीला सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने आत्तापर्यंत १२१६९ आणि कसोटी क्रिकेटमध्ये ७४९० धावा काढल्या आहेत.

कोहलीच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ७० शतके आहेत. आजच्या घडीला संपूर्ण क्रिकेट विश्वातील फलंदाजांपैकी सर्वाधिक शतके त्याच्याच नावे आहेत. हीच गोष्ट अधोरेखित करणारी एक पोस्ट स्पोर्ट्सकीडाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकली होती. ‘सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके नावावर असणारे फलंदाज. विराट कोहली यात कोसो पुढे आहे’, अशा कॅप्शनसह ही पोस्ट त्यांनी टाकली होती. यावर या यादीत ४३ शतकांसह दुसर्‍या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने देखील रिप्लाय दिला. ‘असे म्हणायला हरकत नाही की आम्ही कोणीही विराट कोहलीला गाठू शकत नाही’, असा रिप्लाय देत वॉर्नरने कोहलीचे कौतुक केले आहे. या रिप्लायने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

कोहली पुढील महिन्यात इंग्लंड दौर्‍यावर
भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहली पुढे आता मिशन इंग्लंडचे लक्ष्य असेल. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौर्‍यावर जाणार असून या दौऱ्यात ते सर्वप्रथम न्यूझीलंड विरूद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळतील. या सामन्यात विजय मिळवून आपले पहिले आयसीसी विजेतेपद पटकावण्याचा कोहलीचा प्रयत्न असेल. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडशी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन हात करेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

जागतिक कुस्ती दिनीच भारताच्या अव्वल कुस्तीपटूला अटक, सहा राज्यांमध्ये होता फरार

जेव्हा ब्रेट लीची गोलंदाजी खेळतांना आकाश चोप्राला फुटला होता घाम, पाहा व्हिडिओ

दीपिका पदुकोण ते किम शर्मा! या बॉलीवूड अभिनेत्रींसह होते युवराजचे अफेअर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---