David Warner Retirement: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर डेविड वॉर्नर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यातील विजयानंतर वॉर्नर म्हणाला की, “हे माझ्यासाठी स्वप्नपूर्तीसारखे आहे.” तो एवढी वर्षे ऑस्ट्रेलियाकडून खेळला जे खूप जबरदस्त आहे. यावेळी वॉर्नरने गेल्या वर्षी खेळलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, ऍशेस मालिका आणि विश्वचषक 2023 विजयांचाही उल्लेख केला.
पाकिस्तानविरुद्धचा सिडनी कसोटी सामना हा डेविड वॉर्नर (David Warner) याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना होता. या सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचे त्याने आधीच जाहीर केले होते आणि घरच्या मैदानावर त्याने विजयासह कसोटी क्रिकेटमधून निरोप घेतला. (david warner reacts after playing his last test match in sydney)
डेविड वॉर्नरने कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या डावात 57 धावांची उत्कृष्ट खेळी केली. सामना संपल्यानंतर तो म्हणाला, “हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. मी मालिकेत 3-0 च्या विजयासह निरोप घेतला, जे विलक्षणीय आहे. मी 18 वर्षे 2 महिने ऑस्ट्रेलियन संघासाठी खेळलो, जे जबरदस्त होते. गेल्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली, ऍशेस मालिका बरोबरीत सोडवली आणि विश्वचषक 2023 जिंकला. येथे आम्ही पाकिस्तानविरुद्ध 3-0 असा विजय मिळवला, ही मोठी उपलब्धी आहे. या संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांच्यासोबत खेळणे सन्मानाची गोष्ट आहे. आपल्या घरच्या माणसांसमोर निवृत्त होणे खूप खास आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी मला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”
सिडनी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 8 विकेट्सनी पराभव केला. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ 130 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी खेळाच्या चौथ्या दिवशी दोन विकेट्स गमावून सहज गाठले. (After the last Test of his career, an emotional Warner said referring to the Ashes and the World Cup It’s a dream for me)
हेही वाचा
Ranji Trophy: भाव ‘कैफ’च्या रणजी पदार्पणावर मोहम्मद शमीची भावनिक पोस्ट; म्हणाला, ‘मोठ्या संघर्षानंतर अखेर…’,
BREAKING: अंबाती रायुडूची 9 दिवसांच्या राजकारणातून निवृत्ती, YSRCP सोडून दिला सर्वांना आश्चर्याचा धक्का