बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सिलहेट सिक्सर्सने रंगपूर रायडर्स समोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये रायडर्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात सिक्सर्सकडून खेळताना ऑस्ट्रेलियाचा तुफानी फलंदाज डेविड वॉर्नरने दोन्ही हातांनी फलंदाजी करत सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे.
यावेळी वॉर्नरने डाव्या हाताने फलंदाजी करताना 33 चेंडूत 47 धावा आणि उजव्या हाताने फलंदाजी करताना 3 चेंडूत 14 धावा केल्या आहेत. यामुळे त्याने 36 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या आहेत. यात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले.
चेंडू छेडछाड प्रकरणामुळे राष्ट्रीय संघाबाहेर असणारा वॉर्नर सध्या विविध प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. मात्र त्याला आयपीएलच्या मागच्या हंगामात खेळण्यास मनाई केली होती. याआधी 2018मध्ये तो कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये(सीपीएल) मध्ये आणि ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये विनिपेग हॉक्सिनकडून खेळला आहे.
रायडर्सने घेतलेल्या निर्णयाचा त्यांना चांगलाच फटका बसला. कर्णधार वॉर्नर व्यतिरिक्त सिक्सर्सकडून लिंटन दासनेही रायडर्सविरुद्ध तूफानी फटकेबाजी केली आहे. त्याने सलामीला येताना 43 चेंडूत 70 धावा केल्या. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला.
रायडर्सकडून गोलंदाज शफीअल इस्लामने 4 षटकात 31 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–दुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…
–ऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली






