ऍडलेड। भारताने काल(15 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
या सामन्यात धोनीने 54 चेंडूत 101.85 च्या सरासरीने नाबाद 55 धावा केल्या. त्याने या खेळीत 2 षटकार मारले तसेच कोहलीबरोबर चौथ्या विकेटसाठी 82 धावांची आणि कार्तिकबरोबर पाचव्या विकेटसाठी नाबाद 57 धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला.
मात्र धोनीकडून या सामन्यात एक मोठी चूक झाली ज्यामुळे भारताला 5 धावांची पेनल्टीही लागू शकली असती. धोनीने फलंदाजी करत असताना शॉर्ट रन घेतली म्हणजेच एक धाव पूर्ण केली नाही. मात्र ही चूक मैदानावरील पंचासह ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्याही लक्षात आली नाही. त्यामुळे धोनीच्या आणि भारताच्या खात्यात एक धाव जमा झाली.
https://twitter.com/ALL_IN_ONE_MAN/status/1085528833183236096
ही घटना भारत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 299 धावांचा पाठलाग करत असताना 45 व्या षटकात नॅथन लायन गोलंदाजी करत असताना शेवटच्या चेंडूवर घडली.
यावेळी धोनीने लाँगऑनच्या दिशेने शॉट खेळला आणि धाव घेण्यासाठी तो आणि कार्तिक धावले. कार्तिनने धाव पूर्ण केली पण षटक संपल्याच्या नादात धोनी क्रिजपर्यंत पोहचण्याचे विसरुन गेला आणि त्यामुळे तो शॉर्ट रन झाला. पण ही गोष्ट पंचाच्या लक्षात आली नाही. त्यावेळी भारताला विजयासाठी 31 चेंडूत 45 धावांची गरज होती. धोनी 36 आणि कार्तिक 1 धावांवर खेळत होता.
जर धोनीची ही चूक पंचाच्या लक्षात आली असती, तर भारतासमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकली असती. कारण आयसीसीच्या नियमाप्रमाणे जर फलंदाजाने शॉर्ट रन घेतला तर फलंदाजी करणाऱ्या संघावर पंच 5 धावांची पेनल्टी लावू शकतात.
या घटनेबद्दल चाहत्यांनी पंचांना दोषी धरले आहे. त्यांनी पंचावर टीका केली आहे.
https://twitter.com/parker_pranav/status/1085409659035504643
https://twitter.com/DDALEEP/status/1085411244377546753
https://twitter.com/divu6/status/1085436654591057921
महत्त्वाच्या बातम्या-
–ऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली
–झहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट
–सतत टीम इंडियाचा विचार करणारा धोनी अर्धशतकाच सेलिब्रेशन करायलाही विसरला






