जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम प्लेऑफच्या दिशेने मजल मारत आहे. अशात गुणतालिकेत शेवटून दूसऱ्या स्थानावर असलेला सनरायझर्स हैदराबाद संघ मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करताना दिसला. दरम्यान हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने धमाकेदार अर्धशतकी खेळी करत खास दिवसाला अजून खास बनवले.
झाले असे की, २७ ऑक्टोबर १९८६ रोजी जन्मलेल्या वॉर्नरचा मंगळवारी सामन्याच्यादिवशी ३४वा वाढदिवस होता. या खास दिनी वॉर्नरने सलामीला फलंदाजी येत १९४ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने केवळ ३४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकार लगावत ६६ धावा कुटल्या. यासह वॉर्नर वाढदिवसादिवशी आयपीएलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.
त्याच्यापुर्वी चेन्नई सुपर किंग्सचा क्रिकेटपटू मायकल हसीने हा पराक्रम केला होता. मात्र त्याला वॉर्नरएवढ्या धावा करता आल्या नव्हत्या. २७ मे २०१२ रोजी आपल्या ३७व्या वाढदिवसादिवशी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याने ५४ धावांची नोंद केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या ६ षटकांमध्येच गोलंदाजांचा धुव्वा उडवणारे विस्फोटक फलंदाज
जेवलीस का गं..? इशाऱ्यांद्वारे विचारपूस; गरोदर अनुष्काची मैदानावर असतानाही विराट घेतोय काळजी
“मी तर झोपलोच,” CSK विरुद्ध कोहली-डिविलियर्सची फलंदाजी पाहून माजी क्रिकेटरची मजेशीर प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
बीडच्या छोट्याशा गावातील ‘या’ पोरानं क्रिकेटचं मैदान अक्षरशः दणाणून सोडलं
चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे