ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत वॉर्नर इच्छा नसतानाही त्याच्या तीन मुलींचे मन राखण्यासाठी डान्स करत आहे. वॉर्नर सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग खेळत आहे. लीगमध्ये सिडनी थंडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वॉर्नरचा हा नवीन व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
डेविड वॉर्नर (David Warner) मागच्या मोठ्या काळापासून ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधरापदासाठी दावेदार आहे. मात्र 2018 साली क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्याच्यावर नेतृत्वाची बंदी घातली गेली होती, जी अजूनही कायम आहे. वॉर्नर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो, हे सर्वांनाच माहिती आहे. त्याने यापूर्वी अनेकदा कुटुंबीयांसोबत मजेशीर व्हिडिओ बनवून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पण यावेळी मात्र वॉर्नर त्याच्या मुलींसोबत व्हिडिओ बनवण्यासाठी इच्छुक नसल्याचे पाहायला मिळाले. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा तुमची मुलं तुम्हाला एवढा त्रास देतात तेव्हा तुम्ही हार मानता.”
https://www.instagram.com/reel/Cnns9r9JOMs/?utm_source=ig_web_copy_link
वॉर्नर ज्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असतो, त्याच पटीत चाहत्यांकडून त्याला प्रेम देखील मिळते. त्याच्या फॉलोअर्समध्ये भारतीयांचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. शुक्रवारी (20 जानेवारी) शेअर केलेल्या व्हिडिओवर देखील चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. एका चाहत्याने वॉर्नरचा ‘सुपर डॅड’ असा उल्लेखही केला आहे. त्याच्या बीबीएलमधील प्रदर्शनाचा विचार केला, तर चालू हंगामात त्याने आतापर्यंत तीन सामने खेळले आणि यात अनुक्रमे 19, 0, 26 धावा केल्या आहेत. असे असले तरी, आगामी सामन्यांमध्ये त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा चाहत्यांना आहे.
ऑस्ट्रेलियन संघ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका (बॉर्डर गावसकर ट्रॉफी) खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ही कसोटी मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे. वॉर्नरने यापूर्वी तीन वेळा कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौरा केला आहे. तसेच त्याच्याकडे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल खेण्याचा अनुभव देखील मोठा आहे. वॉर्नरला भारतात खेळण्याचा अनुभव पाहता कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला याचा फायदा मिळू शकतो. (David Warner’s daughters are forcing him to dance Watch Video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाह रे विदर्भ! गुजरातविरूद्ध अवघ्या 73 धावांचा बचाव करत रणजी ट्रॉफीत नोंदवला विक्रमी विजय
ऐतिहासिक! रणजी ट्रॉफीत तब्बल 41 वर्षांनी दिल्लीची मुंबईवर मात, फलंदाजांची हाराकिरी नडली