ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यासाठी ही कसोटी मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण या मालिकेनंतर हा अनुभवी फलंदाज कसोटी फॉरमॅटला अलविदा करणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी यजमान संघाचा माजी अनुभवी गोलंदाज मिचेल जॉन्सन याने डेव्हिड वॉर्नर निशाणा साधला होता, त्यानंतर दोघांमधील वाद आणखी वाढला.
अनेक माजी दिग्गज खेळाडूंनीही या दोघांमध्ये शांतता करण्याचा सल्ला दिला होता. पण, आता डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. कसोटी मालिकेपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “क्रिकेटचा समारोप जोपर्यंत मुख्य बातमी नसेल तोपर्यंत क्रिकेट समारोप नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण या सगळ्या गोष्टींच्या पुढे जात आम्ही पहिला कसोटी सामना पाहत आहोत.”
डेव्हिड वॉर्नर त्याच्या कठोर परिश्रमाबद्दल पुढे म्हणाला, “मी जिथे मोठा झालो तिथेच माझे जुळते. माझ्या आई-वडिलांनी माझे चांगले संगोपन केले, ज्यांनी मला दररोज कठोर परिश्रम करायला शिकवले. जगाच्या मंचावर आल्यावर काय होते ते कळत नाही. मीडिया खूप आहे आणि टीकाही खूप आहे पण त्यातही खूप सकारात्मक गोष्टी आहेत. आणि मला वाटते की, आज तुम्ही काय पाहत आहात ते महत्त्वाचे आहे, लोक क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटला समर्थन देण्यासाठी येथे येत आहेत.”
डेव्हिड वॉर्नरने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 109 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 8487 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 25 शतकेही आहेत. तो आपले शेवटचे तीन कसोटी सामने पाकिस्तानविरुद्ध खेळणार असून त्यांना तो संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करेल. (David Warner’s perfect reply to Mitchell Johnson Said My parents gave me)
महत्वाच्या बातम्या
भारतासाठी प्रतिष्ठेची लढाई! शेवटच्या टी20त नाणेफेक इंग्लंडच्या पारड्यात, दोन्ही संघात महत्वाचे बदल
‘रोहित टी-20 विश्वचषकात नेतृत्व करू शकतो, पण…’, कर्णधाराच्या फॉर्मबाबत गंभीरचे मोठे विधान