---Advertisement---

“पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असणे म्हणजे नेहमीच ४० चेंडूत शतक करणे नव्हे”, इंग्लंडच्या क्रिकेटरने सुनावले खडेबोल

---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला उद्यापासून(९ एप्रिल) सुरुवात होत आहे. या आयपीएलच्या १४ व्य हंगामातून काही खेळाडू आयपीएलमध्ये पदार्पण करताना दिसू शकतात. यात इंग्लंडचा फलंदाज डेविड मलानही समावेश आहे. तो देखील यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. मलानला पंजाब किंग्ज संघाने यंदाच्या हंगामासाठी १.५ कोटींच्या मूळ किमतीत संघात स्थान दिले आहे. पंजाब किंग्ज संघाची पहिली लढत १२ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स संघासोबत होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी मलानने मोठे वक्तव्य केले आहे.

टी२० क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या मलानने ४ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो आता आयसीसीच्या टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच आगामी आयपीएल हंगामात त्याच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष असणार आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या योजनांबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

मलान म्हणाला, “आयपीएलमध्ये निवड होण्यासाठी तुम्हाला चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता असते. बऱ्याच आयपीएल संघांमध्ये इंग्लिश प्रशिक्षक नाहीये. यामुळेच संघात निवड होणे कठीण असते. बऱ्याच संघांचे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक आहेत.”

तसेच तो पुढे म्हणाला, “वेळ बदलत आहे. जगातील सर्वोत्तम टी२० खेळाडूंकडे पाहिले तर तुम्हाला विराट कोहली, रोहित शर्मा, ख्रिस गेल आवडतात. त्या सर्वांनी जवळपास १०० कसोटी सामने खेळले आहेत. टीका आणि अपेक्षा हा खेळाचा एक भाग आहे. आपण सर्व मानव आहोत, असेही दिवस असतात जेव्हा अशी खेळी होते की आपण कधी बॅट उचलली नाही आणि मग असेही काही दिवस येतात जेव्हा आपण कुठल्याही चेंडूला स्टेडियम बाहेर मारू शकतात. तुम्ही तुम्हाला हवे तसे क्रिकेट खेळायला हवे लोकांच्या मनानुसार नाही.”

तसेच तो पुढे म्हणाला, “पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असणे याचा अर्थ असा नाही की आपण दररोज ४० चेंडूंवर शतक ठोकता. जे टीका करतात त्यांना टी२० क्रिकेट खरंच समजत नाही. टी२० चा अर्थ असा नाही की आपण प्रत्येक चेंडूवर मोठे शॉट्स खेळता. आपल्याला आपला अहंकार बाजूला ठेवून संघासाठी खेळावे लागते.”

इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळायच आहे

“माझी पहिली प्राथमिकता इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट खेळणे आहे. पण इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचा अर्थ असा आहे की आपण आयपीएलसाठी आपले नाव देऊ शकत नाही. कारण तुम्हाला वर्षामध्ये ६ ते ८ कसोटी सामने खेळावे लागतील, जे आयपीएल स्पर्धेच्या वेळी आयोजित करण्यात येतात.”

महत्त्वाच्या बातम्या –

सीएसके पुजाराला पहिल्या काही सामन्यांसाठी अंतिम ११ जणांमध्ये स्थान देणार नाही, ‘या’ दिग्गजाचा दावा

“त्याने जर चांगली कामगिरी केली असती, तर तो इतक्या संघाकडून खेळलाच नसता”

रोहितची पलटण करणार आयपीएल २०२१ चा श्रीगणेशा, आरसीबीविरुद्ध होणार पहिली लढत; पाहा मुंबईचे पूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---