---Advertisement---

“त्याने जर चांगली कामगिरी केली असती, तर तो इतक्या संघाकडून खेळलाच नसता”

On: गुरूवार, एप्रिल 8, 2021 9:43 AM
---Advertisement---

आयपीएल स्पर्धा येत्या ९ एप्रिल पासून सुरु होत आहे. हा स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. या स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये रंगणार आहे. अशातच या सामन्यात सर्वांचेच लक्ष रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १४.५ कोटींची बोली लावत संघात स्थान दिलेल्या ग्लेन मॅक्सवेलवर असणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर याने ग्लेन मॅक्सवेल बद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

ग्लेन मॅक्सवेल आगामी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२० हंगामात त्याने पंजाब किंग्स संघाकडून खेळताना निराशाजनक कामगिरी केली होती. यामुळे त्याला पंजाबने लिलावापूर्वी मुक्त केले होते. त्यानंतर लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला खरेदी केले. या मॅक्सवेलबद्दल गंभीरने म्हटले आहे की, त्याने जर चांगली कामगिरी केलेली असती तर तो इतक्या संघांमधून खेळलेला नसता

गौतम गंभीरने दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,” खरे सांगायचे तर, जर मॅक्सवेलने आयपीएलमध्ये खरोखरच चांगली कामगिरी केली असती तर, तो इतक्या फ्रँचायझीसाठी खेळला नसता. तो बर्‍याच फ्रँचायझीसाठी खेळला, कारण तो अजिबात सातत्यपूर्ण नव्हता. आपण असे म्हणू शकत नाही की मागील फ्रँचायझीसाठी जेव्हा जेव्हा मॅक्सवेल खेळला तेव्हा त्याला स्वातंत्र्य नव्हते, जेव्हा तो दिल्लीकडून खेळला तेव्हा त्याला खूप स्वातंत्र्य देण्यात आले होते.”

तसेच तो पुढे म्हणाला की,” जर मॅक्सवेलने कुठल्याही संघासाठी साजेशी कामगिरी केली असती तर त्याला कुठल्याही संघाने मुक्त केले नसते. तुम्ही या गोष्टीवर नक्कीच लक्ष देऊ शकतात की, केकेआर संघात आंद्रे रसलने किती वेळ घालवला आहे आणि त्याने काय केले आहे. ”

तसेच तो पुढे म्हणाला की,”बहुतेक फ्रँचायझी आणि आयपीएल संघ मॅक्सवेलची निवड करतात कारण, त्यांना त्यात एक्स फॅक्टर दिसतो. फ्रँचायझी मॅक्सवेलला संधी देतात. त्याला २०१४ चे हंगाम वगळता इतर कुठल्याही हंगामात त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.”

मॅक्सवेल आत्तापर्यंत आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच आता तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

रोहितची पलटण करणार आयपीएल २०२१ चा श्रीगणेशा, आरसीबीविरुद्ध होणार पहिली लढत; पाहा मुंबईचे पूर्ण वेळापत्रक

कहर योगायोग! जन्मदिनाच्या तारखेएवढ्याच धावा कारकिर्दीत करणारा एकमेव खेळाडू

भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---