---Advertisement---

चेन्नईविरुद्ध विजयाचा हिरो ठरलेल्या ‘गब्बर’चा सुपर भांगडा, व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय

On: रविवार, ऑक्टोबर 18, 2020 4:43 PM
---Advertisement---

शनिवारी (१७ ऑक्टोबर) शारजाह क्रिकेट स्टेडियम येथे झालेल्या आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्सने पराभूत केले. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीपुढे १७९ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल दिल्लीचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शतकी खेळी करत दिल्लीला एकहाती सामना जिंकून दिला. दिल्लीच्या या धमाकेदार विजयानंतर धवनसहित पूर्ण संघाने जोरदार आनंद साजरा केला.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या ‘तनु वेड्स मनु’ या चित्रपटातील ‘कभी सडी गल्ली मुडके वी आया करो’ या पंजाबी गाण्यावर पूर्ण संघाने भांगडा केला. धवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत धवन जमीनीवर पडून नाचताना दिसत आहे आणि श्रेयस अय्यरसह इतर खेळाडू त्याच्या स्टेपची कॉपी करत आहेत. काही खेळाडू तर चक्क खुर्चीवर उभा राहून नाचत आहेत.

सर्वांना पाहताच नाचायला प्रवृत्त करणारा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CGdVrlQDt_6/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/p/CGdjWyQh3EH/

चेन्नईविरुद्धचा विजय हा दिल्लीचा या हंगामातील ७वा विजय होता. यासह दिल्लीने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर उडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शतक झळकावूनही शिखर धवनने केला ‘हा’ नकोसा विक्रम

ड्रेसिंग रुममध्ये सिगारेट ओढताना रंगेहात पकडला गेला फिंच, व्हिडिओ व्हायरल

IPL 2020 : आज हैदराबाद-कोलकाता आणि पंजाब -मुंबई येणार आमने सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

ट्रेंडिंग लेख-

आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---