आयपीएलच्या 13 व्या हंगामात रविवारी (18 ऑक्टोबर) 2 सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता अबूधाबी येथे सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहेत. त्यानंतर दुबईमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स रात्री 7.30 वाजता आमनेसामने येतील. सलग दोन सामन्यात पराभवाला सामोरे गेल्यानंतर हैदराबाद आणि केकेआर कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकू इच्छित आहेत.
वॉर्नरकडे 5000 धावा करण्याची असेल संधी
पहिल्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरला आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करण्याची संधी असेल. या आकड्यापासून तो फक्त 10 धावा दूर आहे. लीगच्या इतिहासात आतापर्यंत आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (5759), चेन्नईचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना (5368) आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (5149) यांनी 5 हजारांचा आकडा गाठला आहे.
पंजाब गुणतालिकेत तळाशी
दुसर्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब आमने सामने येतील. हंगामात सलग 5 पराभवानंतर पंजाबने मागील सामन्यात आरसीबीला पराभूत केले. त्याचवेळी केकेआरविरुद्ध मुंबईने सहज विजय नोंदविला होता. 8 पैकी 2 सामने जिंकून पंजाब गुणतालिकेत तळाशी आहे. तर 8 पैकी 6 सामने जिंकून मुंबई दुसर्या स्थानावर आहे.
कोलकाता नाइट रायडर्सने आतापर्यंत 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. हा संघ 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद 8 पैकी 3 सामने जिंकून 5 व्या क्रमांकावर आहे.
खेळपट्टीबद्दल माहिती आणि हवामान अहवाल
अबूधाबी आणि दुबईमधील सामन्यांच्या दरम्यान आकाश स्वच्छ राहील. अबूधाबीचे तापमान 24 ते 34 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. त्याचवेळी दुबईत तापमान 22 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दोन्ही ठिकाणी खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना मदत होईल. अबू धाबीमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देईल.
त्याचबरोबर दुबईमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल.अबू धाबीमध्ये खेळल्या गेलेल्या मागील 44 टी20 सामन्यात पहिल्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 56.81% आहे त्याचबरोबर, दुबईमध्ये आयपीएलपूर्वी यापूर्वी झालेल्या 61 टी20 सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 55.74% आहे.
अबू धाबीच्या मैदानाबद्दल माहिती :
या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी20 सामने : 44
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 19
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 25
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 137
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 128
दुबईमधील खेळपट्टीबद्दल माहिती
या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी20 सामने : 61
प्रथम फलंदाजीचा करताना मिळालेले जिंकला: 34
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय: 26
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 144
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 122
हैदराबादचा विजय मिळवण्याचा दर आहे केकेआरपेक्षा अधिक
हैदराबादने आयपीएलमध्ये 116 सामने खेळले आहेत. त्यातील 61 सामने जिंकले आहेत आणि 55 गमावले आहेत. म्हणजेच लीगमध्ये त्याच्या विजय मिळवण्याचा दर 52.58% आहे. कोलकाताने 186 सामने खेळले आहेत. त्यातील 96 सामने जिंकले आहेत आणि 90 सामने गमावले आहेत. म्हणजेच लीगमध्ये विजय मिळवण्याचा दर 52.41% आहे.
आयपीएलमध्ये मुंबईचा विजय मिळवण्याचा दर आहे पंजाबपेक्षा अधिक
लीगमधील मुंबईचा विजय मिळवण्याचा दर पंजाबपेक्षा अधिक आहे. आयपीएलमध्ये मुंबईने 195. सामने खेळले आहेत. यापैकी 115 सामने जिंकले आहेत आणि 80 गमावले आहेत, म्हणजेच लीगमध्ये त्याचा विजय मिळवण्याचा दर 58.71% आहे. त्याचबरोबर, लीगमध्ये पंजाबचा विजय मिळवण्याचा दर 45.38% आहे. पंजाबने या लीगमध्ये आतापर्यंत 184 सामने खेळले आहेत त्यातील 84 जिंकले आहेत आणि 100 गमावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून ब्राव्होऐवजी जडेजाने केली शेवटच्या षटकात गोलंदाजी, धोनीने सांगितले कारण
सुपरमॅनने करून दाखवलं! राजस्थानच्या हातून विजय खेचून आणणाऱ्या डिविलिअर्सचे ट्विटरवर जोरदार कौतुक
ट्रेंडिंग लेख –
-यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे
-आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण
-आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा एन्रीच नॉर्किए आहे तरी कोण?