---Advertisement---

सुपरमॅनने करून दाखवलं! राजस्थानच्या हातून विजय खेचून आणणाऱ्या डिविलिअर्सचे ट्विटरवर जोरदार कौतुक

On: रविवार, ऑक्टोबर 18, 2020 11:42 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. बेंगलोरकडून धडाकेबाज फलंदाज एबी डिविलिअर्सने पुन्हा एकदा तुफानी डाव खेळला आणि अखेरच्या षटकांत आरसीबीला विजय मिळवून दिला.

डिविलिअर्सने 22 चेंडूत 1 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. त्याने 19 व्या षटकात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर सलग 3 षटकार ठोकले आणि एकूण 25 धावा केल्या, तेथून सामना बेंगलोरकडे वळला. राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने फेकलेल्या शेवटच्या षटकात डिविलिअर्सने षटकार मारून विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीचे ट्विटरवर जोरदार कौतुक होत आहे.

https://twitter.com/cric_blog/status/1317461903304617984?s=20

https://twitter.com/liaml4893/status/1317463393314443265

या सामन्यात 178 धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा सलामीवीर अ‍ॅरॉन फिंच (14 धावा) पुन्हा एकदा अपयशी ठरला. पण सलामीवीर देवदत्त पदिक्कल ( 35 धावा) आणि कर्णधार विराट कोहली (43 धावा) यांनी दमदार डाव खेळला. अखेर या थरारक सामन्यात डिविलिअर्सने विजय मिळवून दिला.

डिविलिअर्सचे आयपीएल कारकिर्दीतील हे 37 वे अर्धशतक होते. याआधी त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 33 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी खेळली होती.

हा आरसीबीचा या हंगामातील 6 वा विजय होता. 12 गुणांसह आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स शीर्ष स्थानी असून मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सामन्याआधी विराटपासून ‘ती’ गोष्ट लपवली, डिविलिअर्सने केला खुलासा

‘मिस्टर ३६०’ ठरला आरसीबीचा संकटमोचक, ७ विकेट्सने राजस्थानला लोळवलं

IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या दिग्गजांकडून ‘अर्जुन’ घेतोय गोलंदाजीचे धडे

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---