---Advertisement---

सीएसके समर्थक मुंबईच्या संपर्कात, शनिवारच्या पराभवानंतर करणार जाहीर प्रवेश? वाचा सोशल मीडियावरील कहर मीम्स

On: रविवार, ऑक्टोबर 18, 2020 10:08 AM
---Advertisement---

शनिवारी एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध श्रेयस अय्यर नेतृत्त्व करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएलचा ३४वा सामना पार पडला. हा सामना युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली संघाने ५ विकेट व १ चेंडू राखून जिंकला.

सामना सीएसकेचा असल्याने सीएसके समर्थकांबरोबरच कटटर विरोधक असलेल्या मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनेही हा सामना तेवढ्याच आवडीने पाहिला. परंतू ९ सामन्यात ६वा पराभव पाहिलेल्या एमएस धोनीच्या सीएसेकेला यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. हे ट्रोल करण्यात दिल्लीचे पाठीराखे कुठेही दिसले नाहीत. यात आघाडीवर होते ते मुंबई इंडियन्सचे चाहते. निशाण्यावर होता सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी व संपुर्ण संघ.

फेसबुकवर असलेल्या ‘एक करोड चेन्नई Vs मुंबई इंडियन्स समर्थकांचा ग्रुप’ नावाच्या ग्रुपवर तर मीम्सचा पाऊस पडला. अगदी रात्री २ वाजेपर्यंत या ग्रुपवर धोनीच्या सीएसकेवर अनेक मीम्स येत होते. त्यातील काही निवडक मीम्स किंवा जोक्स-

१. फक्त एक बॉलने हारलेत ना. त्यात काय एवढं. मागे तर तीस तीस रनने हारले होते. टायगर अबी जिंदा हैं.
२. आजवर मॅच हारली की ह्रदय जिंकलं म्हणायचे. शनिवारपासून फुफ्फुस जिंकायला सुरुवात केलीय वाटतं.
३. पिवळ फक्त हिंग असतंय. किंग नसतंय.
४. बापू कोणी करणी केली आमच्या टीमवर. वारे फिरले आहेत.
५. शर्मा वडापाव खातो पण बॉल नाही खात.

६. चेन्नईचे फॅन्स नाराज नका होऊ. एक दोन कॅचचे व्हिडीओ टाका आणि खाली लिहा.. ह्रदय जिंकले फुफ्फुस जिंकले.
७. काल धोनीचे शतक केवळ ९७ धावांनी हुकले
८. इकडं उग चेन्नई चेन्नई करत्यात. ड्रीम ११मध्ये मुंबईचे प्लेअर घेत्यात.
९. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे. रोज रोज वाईड बॉलसाठी हुज्जत घालणाऱ्यांचा नाही.
१०. सीएसकेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. असेच विजयी होत राहा.

११. शेवटची ओव्हर स्पिनरला देणाऱ्यांचा मला विशेष आदर वाटतो.
१२. चेन्नई फॅन्स- आम्ही १० विकेट्सने जिंकतो. मुंबई फॅन्स- आपण नुसतं पॉईंट टेंबलकडे पाहात बसायचं
१३. सीएसके समर्थक- मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल. आर दिल्ली पार घरी जायची वेळ आणली.
१४. लहान मुलांच्याकडून पण हारला रे सीएसके वाल्यांनो
१५. बाहेर या मिट्रो. कोणी काही बोलणार नाही. अशी पण तुम्हाला खूप सवय झालीय याची.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठ-मोठ्या गोलंदाजांची चिरफाड करणारा संजू सॅमसन ‘या’ गोलंदाजापुढे होतो गपगार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---