शनिवारी (दि. 20 मे) आयपीएल 2023चा 67वा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 3.30 वाजता सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्याबाबत असे म्हटले जात आहे की, हा हंगाम त्याचा अखेरचा आयपीएल हंगाम असू शकतो. मात्र, धोनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नाहीये. धोनी या हंगामात खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत आहे. त्याच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह आहे. आता संघाचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी याने मोठे वक्तव्य केले आहे. त्याने एमएस धोनीच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे.
धोनीच्या गुडघ्याची दुखापत कशी आहे?
मायकल हसी (Michael Hussey) याने एमएस धोनी (MS Dhoni) याच्या तळात फलंदाजी करण्यामागील कारण त्याची गुडघ्याची दुखापत सांगितली. तो म्हणाला की, “त्याचा गुडघा 100टक्के बरा झाला नाहीये. फलंदाजी करावी अशी त्याची स्वत:ची इच्छा आहे. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे असे होणार नाही. वरच्या क्रमांकावर खेळून वेगाने धावा घेत गुडघ्यावर जोर पडावा असे धोनीला वाटत नाही. तो धावताना लंगडताना दिसला आहे. त्याला समस्या होत आहे, तरीही तो यष्टीरक्षण करत आहे. तसेच, फलंदाजीतून मोलाचे योगदान देत आहे.”
धोनीमुळे मिळतो पाठिंबा
पुढे बोलताना हसी म्हणाला की, “तो संपूर्ण स्पर्धेत जितके होईल, तितकी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. धोनी कोणत्याही स्टेडिअममध्ये खेळायला जातो, तेव्हा त्याला प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळतो. तो एक क्षणासाठीही स्क्रीनवर आला, तर संपूर्ण स्टेडिअम एकच जल्लोष करू लागतो. मग ते विरोधी संघाचं मैदान का असेना.” धोनीमुळे चेन्नईला मिळणाऱ्या पाठिंब्याविषयी हसी म्हणाला की, “सर्वप्रथम एमएसमुळेच एका संघाच्या रूपात आम्हाला जो पाठिंबा मिळाला आहे, ते अद्भूत आहे.”
धोनीची हंगामातील कामगिरी
हंगामातील धोनीच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 13 सामन्यात फलंदाजी करताना 98 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 196च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याने चौकार कमी आणि षटकार जास्त मारले आहेत. धोनीने यादरम्यान 3 चौकार आणि 10 षटकारांचा पाऊस पाडला आहे. (dc vs csk ms dhoni is not 100 percent fit chennai super kings coach michael hussey told about his knee condition)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये पंजाबच्या शतकवीराचा ‘असा’ काढला काटा, Video
IPLमध्ये धवनचा भीमपराक्रम! 16 वर्षात कुणालाच न जमलेली कामगिरी दाखवली करून, विराट-रोहितलाही पछाडलं