आयपीएलमध्ये शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात चेन्नईकडून फलंदाजी करताना अष्टपैलू रवींद्र जडेजाने डावाच्या 18 व्या षटकात स्टेडियमबाहेर षटकार ठोकला. यानंतर जे घडले ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल.
दिल्लीचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेच्या 18 व्या षटकात जडेजाने डीप स्क्वेअर लेगवरून 79 मीटरचा षटकार मारला आणि चेंडू स्टेडियमच्या बाहेर थेट रस्त्यावर गेला. चेंडू रस्त्यावर पडल्यामुळे रस्त्यावरून जाणारा एक व्यक्ती चेंडू घेऊन पळून गेला. आयपीएलमध्ये याआधी झालेल्या सामन्यातही मैदानातून बाहेर गेलेला चेंडू घेऊन एक व्यक्ती पळून गेला होता.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने 20 षटकांत 4 बाद 179 धावा केल्या. जडेजाने 13 चेंडूत 4 षटकारांसह 33 धावा फटकावल्या. अनुभवी फलंदाज अंबाती रायडूने 25 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. या दोन फलंदाजांशिवाय सलामीवीर फाफ डु प्लेसिसने 58 आणि वॉटसनने 22 चेंडूत 36 धावा केल्या. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी (एमएस धोनी) केवळ 3 धावा करून बाद झाला.
दिल्ली कॅपिटल्सकडून वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किएने 2, तुषार देशपांडे आणि कागिसो रबाडाने प्रत्येकी 1 गडी बाद केले.
https://twitter.com/msnandhis/status/1317490510949355520
https://twitter.com/_rchie0425/status/1317489959087976448
https://twitter.com/IPL/status/1317494643798409216?s=20
https://twitter.com/rcdas06/status/1317488937607127041
https://twitter.com/IndianBackchod/status/1317538998420598784
https://twitter.com/iamhimanshu_raj/status/1317501637599006721
https://twitter.com/GauravP26479152/status/1317491152145190912
प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सीएसकेला सामने जिंकणे फार महत्वाचे आहे. एका सामन्यातील पराभवदेखील सीएसकेला या शर्यतीतून बाहेर करू शकते. दिल्ली सध्या गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहे. दिल्लीकडून खेळताना वेगवान गोलंदाज रबाडाने 50 बळी घेतले आहे. अमित मिश्रा नंतर दिल्लीकडून खेळताना 50 बळी घेणारा रबाडा दुसरा गोलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पिच्चर अभी बाकी हैं! अजूनही चेन्नई पोहचू शकते प्लेऑफमध्ये, कसे ते घ्या जाणून
…म्हणून ब्राव्होऐवजी जडेजाने केली शेवटच्या षटकात गोलंदाजी, धोनीने सांगितले कारण
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष