उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रीमियर लीगच्या ट्रान्सफर विंडोचा आज शेवटचा दिवस आहे. यामध्ये झालेल्या लिलावात आतापर्यंत क्लब्सने १०,५०० कोटी रुपये (१.२ बिलीयन पौंड) पेक्षा जास्त खर्च केले आहेत.
यामध्ये लीव्हरपूलने सर्वाधिक असे १५०० कोटी रुपये (१६५ मिलीयन पौंड) तर तोटेनहॅमला यामध्ये एकाही खेळाडूला घेता आले नाही. मागील हंगामातील लिलावात क्लब्सने १.५ बिलीयन पौंड पेक्षा जास्त खर्च केला होता.
पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने जुवेंट्स फुटबॉल क्लबसोबत चार वर्षांसाठी ८४६ कोटी रुपयांचा करार केला आहे. हा या हंगामातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.
त्यातच चेल्सीने गोलकिपर केप अरिझबालागाला करारबध्द केल्याने एक जागतिक विक्रम केला. या २३ वर्षीय फुटबॉलपटूने ६३० कोटी रुपयांमध्ये सात वर्षासाठीचा करार केला. याआधी हा विक्रम ब्राझिलियन गोलकिपर अॅलिसोन बेकर याच्या नावे होता. बेकरसाठी लीव्हरपूलने ६२.५ मिलियन युरो मोजले होते.
तसेच उद्या प्रीमियर लीगचा पहिला सामना लीसेस्टर सिटी विरुद्ध मॅंचेस्टर युनायटेड असा सामना आहे. मात्र या सामन्यात कोण खेळणार हे अजून निश्चित नाही. कारण युनायटेडचा पॉल पोग्बा याचा क्लब सोडायचा विचार आहे. तर काही खेळाडू दुखापतीतून सुधारत आहेत.
लीसेस्टरचा हॅरी मग्युरे हा पण क्लब सोडण्याच्या विचारातच होता. मात्र त्याने आपण सामन्यासाठी सज्ज आहोत, असे ट्विट करून संघाकडून खेळण्याचा विचार कायम आहे हे दर्शविले.
Can’t wait for the season to start tomorrow. ⚽️🦊💙 #lcfc
— Harry Maguire (@HarryMaguire93) August 9, 2018
विजयाने या हंगामाती सुरूवात करण्यासाठी हा सामना दोन्ही क्लबसाठी महत्त्वाचा असणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–११ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा
–बेन स्टोक्सने मला जीवे मारले असते