---Advertisement---

तो येथील परिस्थितीत घातक ठरेल; द. आफ्रिकेच्या कर्णधाराला वाटतेय भारताच्या ‘या’ गोलंदाजाची भीती

Ishant-Sharma-and-Jasprit-Bumrah
---Advertisement---

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिकेत आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात (south africa tour of india) भारताला तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. दक्षिण अफ्रिकेतील परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात वेगवान गोलंदाजांना अधिक महत्व प्राप्त होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशात दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) याने भारतीय वेगवान गोलंदाजांविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय संघाने मागच्या काही वर्षात परदेशी दौऱ्यात अप्रतिम प्रदर्शन केले आहे. अशात दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत देखील संघाकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने संघातील वेगवान गोलंदाजांकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. पुजाराच्या मते भारताचे वेगवान गोलंदाज आगामी मालिकेतील प्रत्येक कसोटी सामन्यात संघाला २० विकेट्स मिळवून देऊ शकतात.

यानंतर आता कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळायला सुरुवात होण्यापूर्वी दक्षिण अफ्रिका संघाचा कर्णधार डीन एल्गरने एक वर्चुअल पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्याने भारतीय संघाचे गोलंदाज दक्षिण अफ्रिका संघासाठी घातक ठरू शकत असल्याचे सांगितले आहे. एल्गरने यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराह (Jasprit Bumrah) याच्या नावाच विशेष उल्लेख केला.

‘हे’ आहेत वर्ष २०२१ चे टॉप-१० टी२० फलंदाज, यादीत पाकिस्तानींचा बोलबाला; तर एकही नाही भारतीय

एल्गर यावेळी म्हणाला की, “बुमराह एक विश्वस्तरीय गोलंदाज आहे. जर एखादा गोलंदाज दक्षिण अफ्रिकेतील परिस्थितीचा चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकला, तर तो बुमराह असेल. पण आम्ही पुन्हा एकदा म्हणू की, एका खेळाडूवर आमचे लक्ष नसेल, कारण भारत एक भक्कम बाजू आहे.”

सध्या कोरोणाचा नवीन विषाणू ऑमिक्रॉनने सर्वत्र थैमन घातले आहे. दक्षिण अफ्रिकेतून या विषाणूचा उगम झाल्याचे सांगितले गेले आहे. या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील टी-२० मालिका रद्द करण्यात आली आणि आता खेळल्या जाणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेवरही त्याचा परिणाम झाला आहे. दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डाने आगामी मालिकेत कडक कोरोना निर्बंध लादले आहेत आणि स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाकरण्यात आली आहे. अशात खेळाडूंना मोकळ्या स्टेडियममध्ये मालिका खेळावी लागणार आहे आणि डीन एल्गरने याबाबतीत नाराजी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या –

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण

Video: वयाच्या ३८ व्या वर्षी ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने टिपला भन्नाट झेल, पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

कडक ना भावा!! ‘या’ २३ वर्षीय फलंदाजाने सलग ५ षटकार मारल्यानंतर आता झळकावले तुफानी शतक

व्हिडिओ पाहा –

जगातील कोणत्याही फलंदाजाला १० प्रकारे तुम्ही करु शकता बाद । 10 Ways Batsman Can Be Given OUT

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---