---Advertisement---

‘ही’ चूक केली नसती, तर आयपीएलमध्ये दीपक चाहरला लागली असती २ कोटींची बोली, वडिलांनी व्यक्त केली खंत

On: गुरूवार, जुलै 22, 2021 6:54 PM
Faf Du Plessis, Deepak Chahar and DJ Bravo
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने वनडे मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात दीपक चाहरने अष्टपैलू कामगिरी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. अशातच त्याच्या वडिलांनी देखील २०१८ आयपीएल लिलावतील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

दीपक चाहरचे वडील लोकेंद्र चाहर यांनी २०१८ आयपीएल लिलावातील जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले की, “ही आमची चूक होती, दीपकने एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव नोंदणी केली होती. अष्टपैलू खेळाडूंवर त्या दिवशी उशिरा बोली लावण्यात आली होती. राहुलने गोलंदाज म्हणून नोंदणी केली होती. या लीलावात राहुलचे नाव लवकर पुकारले गेले होते. त्यानंतर जेव्हा दीपकचे नाव पुकारले गेले होते, तेव्हा संघाचे पैसे देखील संपले होते. नाहीतर दीपकवर २ कोटींची बोली लागली असती.”

या लिलावात दीपक चाहरला चेन्नई सुपर किंग्स संघाने ८० लाखांची बोली लावत संघात स्थान दिले होते. तर राहुल चाहरला मुंबई इंडियन्स संघाने १.९ कोटींची बोली लावत खरेदी केले होते. (Deepak chahar father said son would have got more than rs 2crore in ipl auction)

दीपक चाहरने एक फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघासाठी देखील त्याने एक आठवणीत राहील, अशी खेळी केली होती. त्याने ६ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत २० चेंडूंमध्ये ३९ धावांची खेळी केली होती. लोकेंद्र चाहर यांनी पुढे म्हटले की,”त्याच्या गोलंदाजीबाबत बोलायचं झालं तर तो आणखी वेगाने गोलंदाजी करू शकतो. तो ताशी १४० किमी वेगाच्या पुढे जाऊ शकतो.”

दुसऱ्या वनडे सामन्यात भुवी – चाहरची विजयी भागीदारी
दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघासमोर २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघातील गोलंदाजांनी भारतीय संघातील मुख्य फलंदाजांना लवकर माघारी धाडले होते. असे वाटू लागले होते की, श्रीलंका संघ या सामन्यात एकहाती विजय मिळवणार. परंतु, शेवटी दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जोडीने ८४ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला सामना जिंकून दिला. यामध्ये दीपक चाहरने ६९ धावांचे योगदान दिले तर, भुवनेश्वर कुमारने १९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले.

महत्त्वाच्या बातम्या – 

SL vs IND: तिसऱ्या वनडे सामन्यात होऊ शकतात ४ मोठे बदल; ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी

‘हा’ युवा क्रिकेटपटू भारताचे भविष्य, माजी भारतीय यष्टीरक्षकाने गायले गुणगान

द्रविडच्या ‘या’ मास्टरस्ट्रोकमुळे भारतीय संघाने मिळवला विजय, भुवनेश्वर कुमारने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---