मंगळवारी (२० जुलै) झालेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. तसेच मालिकेतील तिसरा वनडे सामना येत्या २३ जुलै रोजी खेळला जाणार आहे. ही मालिका भारतीय संघाने जिंकली आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात. चला तर पाहूया असे ४ खेळाडू ज्यांचे मिळू शकते संधी
देवदत्त पडिक्कल
तिसऱ्या वनडे सामन्यात पृथ्वी शॉऐवजी देवदत्त पडिक्कल सलामीला फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरू शकतो. याचे कारण असे की, भारतीय संघाने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापन तिसऱ्या वनडे सामन्यात शॉला विश्रांती देऊन पडीक्कलला अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्याचा विचार करू शकतात.
नितीश राणा
भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज मनीष पांडे हा पहिल्या दोन सामन्यात मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरला आहे. पहिल्या सामन्यात त्याने ४० चेंडूत अवघ्या २६ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या वनडे सामन्यात देखील तो मोठी खेळी साकारू शकला नव्हता. अशातच तिसऱ्या वनडे सामन्यात मनीष पांडेला विश्रांती देऊन त्याच्या ऐवजी नितीश राणाला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. नितीश राणा गेल्या काही वर्षांपासून आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. (These 4 Indian youngsters will make their international debue in third odi against srilanka)
चेतन सकारिया
दुसऱ्या वनडे सामन्यात विजयी खेळी साकारणाऱ्या दीपक चाहरला तिसऱ्या वनडे सामन्यात विश्रांती देण्यात येऊ शकते. त्याच्या ऐवजी चेतन सकारियाला संधी दिली जाऊ शकते. चेतन सकारियाने आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवले आहे. तसेच त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याचे कौशल्य आहे.
वरूण चक्रवर्ती
भारतीय संघव्यवस्थापन वरूण चक्रवर्तीला तिसऱ्या वनडे सामन्यात पदार्पण करण्याची संधी देऊ शकतात. वरूण चक्रवर्ती आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. या संघाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. यापूर्वी देखील त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली होती. परंतु, फिटनेस टेस्ट पूर्ण करण्यास अपयशी ठरल्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. तो तिसऱ्या वनडे सामन्यात कुलदीप यादव ऐवजी वनडे संघात पदार्पण करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ युवा क्रिकेटपटू भारताचे भविष्य, माजी भारतीय यष्टीरक्षकाने गायले गुणगान
द्रविडच्या ‘या’ मास्टरस्ट्रोकमुळे भारतीय संघाने मिळवला विजय, भुवनेश्वर कुमारने केला खुलासा
दुखापतीतून सावरताच विराट कोहलीने सुरु केला सराव; ताबडतोड शॉट्स खेळताना दिसला कर्णधार, पाहा व्हिडिओ