---Advertisement---

टी२०मध्ये हॅट्रीक घेत विश्वविक्रम करणाऱ्या चाहरने आयसीसी क्रमवारीतही घेतली गरुडझेप!

On: मंगळवार, नोव्हेंबर 12, 2019 12:45 PM
---Advertisement---

रविवारी भारत विरुद्ध बांगलादेश संघात झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात दीपक चाहरने 3.2 षटके गोलंदाजी करताना 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने आयसीसी टी20 क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

आयसीसीने सोमवारी जाहिर केलेल्या टी20 क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत चाहरने 88 स्थानांची झेप घेत 42 वे स्थान मिळवले आहे. चाहर भारताकडून टी20मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचाही विश्वविक्रम केला आहे

तसेच गोलंदाजांच्या या क्रमवारीत न्यूझीलंडचा मिशेल सँटेनर दुसर्‍या स्थानावर आला आहे. गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान आहे.

भारताच्या अन्य गोलंदाजांमध्ये कृणाल पंड्या 6 स्थानांची प्रगती करत ख्रिस मॉरिससह संयुक्त 18 व्या स्थानावर आला आहे. तसेच युजवेंद्र चहल 9 स्थानांनी पुढे येत 25 व्या आणि वॉशिंग्टन सुंदर 21 स्थानांची उडी घेत 27व्या स्थानावर आला आहे.

त्याचबरोबर श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्धच्या टी20 मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ऍश्टन एगारने तब्बद 57 स्थानांची प्रगती करत 9 वे स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत गोलंदांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये एकही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.

त्याचबरोबर फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा सातव्या स्थानावर कायम आहे. तर रविवारी बांगलादेश विरुद्ध टी20मध्ये अर्धशतक झळकावणारा केएल राहुल एका स्थानाने पुढे येत आठव्या स्थानावर आला आहे. पहिल्या 10 फलदाजांमध्ये केवळ हे दोन भारतीय फलंदाज आहेत.

अन्य भारतीय फलंदाजांमध्ये शिखर धवन 12 व्या स्थानावर आहे. तसेच खराब फॉर्ममधून जात असलेला रिषभ पंत 89 व्या स्थानावर घसरला आहे. त्याचबरोबर विराट कोहली 15 व्या क्रमांकावर आहे.

या फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा ऍरान फिंच दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन आणि मार्टिन गप्टिल संयुक्तरित्या 9 व्या क्रमांकावर आले आहेत. मॉर्गनने 10 स्थानांची आणि गप्टिलने 7 स्थानांनी झेप घेतली आहे.

तसेच बांगलादेशचा फलंदाज मोहम्मद नाईम भारताविरुद्ध केलेल्या शानदार कामगिरीमुळे 38 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 143 धावा केल्या होत्या.

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत काहीकाळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतलेला ग्लेन मॅक्सवेल अव्वल स्थानावरुन दुसऱ्या स्थानी घसरला आहे. त्याला अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. या क्रमवारी पहिल्या 20 जणांच्या खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.

संघ क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पाकिस्तान कायम आहे. त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. या दोन संघामध्ये केवळ 1 गुणाचा फरक आहे. तसेच या क्रमवारीत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---