---Advertisement---

दीपक चाहराने १५ वर्षांचा जुना फोटो केला शेअर; शेन वॉट्सनसाठी दिला ‘हा’ खास संदेश

On: शनिवार, सप्टेंबर 19, 2020 10:32 AM
---Advertisement---

मुंबई । चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि शेन वॉटसन हा संघात गेल्या तीन वर्षापासून सीएसके संघाकडून खेळत आहेत. चेन्नई सुपर किंग्जने गुरुवारी खेळाडूंसाठी विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले. या समारंभात शेन वॉटसन, एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा यांना गौरविण्यात आले.

यावेळी संघाचा गोलंदाज दीपक चाहरने वॉटसनबरोबर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत एकीकडे तो वॉटसनबरोबर चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीमध्ये दिसला होता, तर दुसरा फोटो 15 वर्ष जुना आहे, ज्यात चाहर वॉटसनबरोबर त्याचा चाहता म्हणून उभा राहिलेला दिसला आहे.

फोटो कॅप्शनमध्ये चाहरने लिहिले की, “हे माझे 15 वर्षांचे आव्हान आहे, फक्त आणि फक्त दिग्गज शेन वॉटसन याच्यासमवेत.”

https://twitter.com/deepak_chahar9/status/1306551818110070784

चाहरने काहीदिवसांपूर्वी प्रशिक्षणास सुरूवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या या वेगवान गोलंदाजास युएईला पोहोचताच, कोरोनाची लागण झाली होती. यानंतर, तो क्वारंटाईन झाला होता. तथापि, तो आता कोरोना विषाणूपासून मुक्त झाला आहे आणि पुन्हा संघात सामील झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलचा पहिला सामना कुठे, कधी आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर

‘हा’ गोलंदाज मलिंगाची कमतरता पूर्ण करेल;ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने सांगितले नाव

जेव्हा जेव्हा मुंबई इंडियन्स पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल

ट्रेंडिंग लेख –

“नवा बोथम” म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफ विषयी १० रंजक गोष्टी

‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार

हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---