कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात रविवारी टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना (3rd T20I) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने १७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत ३-० असा पाहुण्या वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला. असे असले तरी भारतीय संघासाठी या सामन्यादरम्यान एक चिंताजनक गोष्ट घडली. भारताचा वेगवान गोलंदाज दीपर चाहर (Deepak Chahar) दुखापतग्रस्त झाला आहे.
हा सामना खेळत असताना त्याच्या स्नायूंमध्ये ताण (हॅमस्ट्रिंगची दुखापत) जाणवू लागला, त्यामुळे सामना सुरू असतानाच त्याला मैदानाबाहेरही जावे लागले. खरंतर दीपकने त्याच्या गोलंदाजीची चांगली सुरुवात केली होती. त्याने वेस्ट इंडिजच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले होते. मात्र, तो त्याच्या दुसऱ्या षटकात गोलंदाजी करत असतानाच त्याला वेदना होऊ लागल्या. या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना तो लंगडतानाही दिसला (Deepak Chahar sustains hamstring pull).
तो चेंडू टाकण्यासाठी रनअप पूर्ण करत असतानाच त्याच्या स्नायूंमध्ये ताण आला. त्यामुळे तो चेंडू फेकल्यानंतर मैदानावरच झोपला. त्यानंतर भारतीय संघाच्या फिजिओ यांनी मैदानावर येऊन त्याला तपासले. मात्र, त्याला बरं वाटत नसल्याने तो मैदानाबाहेर गेला.
त्याची ही दुखापत कितपत गंभीर आहे, याबद्दल अद्याप बीसीसीआयने माहिती दिलेली नाही. मात्र, जर त्याची दुखापत गंभीर असेल , तर त्याला आगामी श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेला मुकावे लागले. एवढेच नाही, तर इंडियन प्रीमीयर लीगच्या १५ हंगामातही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. या हंगामासाठी त्याला चेन्नई सुपर किंग्सने १४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे.
दीपकचे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळणे कठीण
श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येत असून २४ फेब्रुवारी पासून भारत आणि श्रीलंका यांच्याच ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. ही मालिका लखनऊमध्ये होणार असून या मालिकेसाठी दीपक चाहरचा भारतीय संघात समावेश आहे. मात्र, त्याच्या दुखापतीचा विचार करताना तो या मालिकेत खेळणे कठीण दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुलगा आवेशच्या पदार्पणाविषयी वडिलांना नव्हती कसलीही कल्पना; म्हणाले, ‘खूप दिवसांपासून वाट पाहात…’
ईशान किशनने ७.७५ कोटींच्या गोलंदाजाला धू धू धुतलं, एकाच षटकात ३ खणखणीत चौकार ठोकले
T20 Series: वेस्ट इंडिजला क्लिन स्वीप करत कर्णधार रोहितने विराटला केले ओव्हरटेक, बनला ‘नंबर १’