भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi t20 series) यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने (kieron pollard) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ विकेट्सच्या नुकसानावर १८४ धावा केल्या. दरम्यान, भारताचा सलामीवीर फलंदाज ईशान किशन (ishan kishan) याने वेस्ट इंडीजच्या एका गोलंदाजी अष्टपैलूची चांगलीज धुलाई केली, ज्याच्यावर आयपीएल मेगा लिलावात तब्बल ७ कोटी ७५ लाख रुपयांची बोली लागली आहे.
भारतीय संघ फलंदाजी करत असताना चौथ्या षटकात ईशान किशन आणि श्रेयस अय्यर हे दोघे खेळपट्टीवर उपस्थित होते. वेस्ट इंडीजचा रोमारियो शेफर्ड (romario shepherd) या षटकात गोलंदाजीसाठी आला होता. ईशान किशन या षटकात धुलाई करण्याच्याच विचारात होता. षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने दोन चौकार मारले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर देखील ईशानने चौकार मारला. असे असले तरी, शेफर्डने राहिलेले तीन चेंडू मात्र निर्धाव फेकले, त्यामुळे या षटकात भारताला एकूण १२ धावा मिळाल्या.
After the loss of an early wicket, a fine 50-run partnership comes up between @ishankishan51 & @ShreyasIyer15 ????????
Live – https://t.co/e1c4fOY0JR #INDvWI @Paytm pic.twitter.com/AsZEWcHrj9
— BCCI (@BCCI) February 20, 2022
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात रोमारियो शेफर्डला ७.७५ कोटी रुपयांमध्ये सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले आहे. त्यामुळे त्याच्यावर या सामन्यात खास लक्ष होते. तर दुसरीकडे ईशान किशनचा विचार केला, तर त्याने या तिसऱ्या सामन्यात पाच चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. दरम्यान मालिकेतील त्याच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ते समाधानकारक राहिलेले नाहीय. त्याला आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटींना विकत घेतले आहे.
दरम्यान, वेस्ट इंडीज संघासाठी हा भारत दौरा खूपच निराशाजनक राहिला आहे. शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला. त्यापूर्वी मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले होते. अशा प्रकारे भारताने या मालिकेत वेस्ट इंडीजला व्हाईट वॉश (३-०) दिला आहे. टी-२० मालिकेपूर्वी उभय संघात एकदिवसीय मालिका खेळली होती. एकदिवसीय मालिकेतही भारताने वेस्ट इंडीजला व्हाईट वॉश दिला होता.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ चे वेळापत्रक जाहीर होण्यास का होतोय विलंब? कारण आले पुढे
आयपीएल २०२२ पूर्वी धोनीचा कोट्यधीश गोलंदाज चर्चेत, फक्त ७ षटकांमध्ये संघाचा विजय केलाय निश्चित
‘हा’ माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बनला अफगाणिस्तानचा प्रशिक्षक, बांगलादेश दौऱ्यावर स्विकारणार जबाबदारी