झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजीत दमदार प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजीला आलेल्या यजमान झिम्बाब्वे संघाला पाहुण्या भारतीय गोलंदाजांनी दिवसा चांदणे दाखवले. प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल यांच्याबरोबरच पुनरागमन करत असलेल्या दीपक चाहर यानेही प्रभावित केले. दुखापतीनंतर जवळपास ६ महिन्यांनी भारतीय संघात परतलेल्या चाहरने अवघ्या ९ चेंडूत झिम्बाब्वेच्या ३ विकेट्स काढल्या. त्याचे प्रदर्शन पाहता त्याची येत्या टी२० विश्वचषक २०२२ मधील जागा निश्चित दिसत आहे.
या सामन्यात (India vs Zimbabwe) नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी निवडली आणि झिम्बाब्वेला फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतीय कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) घेतलेला हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. त्यातही ३० वर्षीय वेगवान गोलंदाज चाहर (Deepak Chahar) याने संघाला चांगली सुरुवात करून देण्यात मोलाचे योगदान दिले.
चाहरने डावातील सातव्या षटकात संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्याच्या या षटकातील चौथ्या चेंडूवर झिम्बाब्वेचा सलामीवीर इनोसेंट काइया झेलबाद झाला. यष्टीरक्षक संजू सॅमसनने ४ धावांवर त्याचा झेल घेतल्याने त्याला माघारी परतावे लागले. त्यानंतर तो नववे षटक टाकण्यासाठी आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याला सलामीवीर तादिवानसे मारुमनीची विकेट मिळाली. ८ धावांवर खेळत असलेला मारुमनी चाहरच्या नवव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षक संजूच्या हातून झेलबाद झाला.
https://youtu.be/BqCzNI2QdGQ
पुढे कर्णधार राहुलने डावातील अकरावे षटक चाहरकडे दिले. हे चाहरचे सलग तिसरे षटक होते, ज्यामध्ये त्याने विकेट काढली. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने वेल्से माधवेरे याला पायचित केले. माधवेरे ५ धावांवर बाद झाला. अशाप्रकारे चाहरने सलग ३ षटकांतील ९ चेंडूत चाहरने झिम्बाब्वेच्या ३ फलंदाजांना पव्हेलियनला (Deepak Chahar Comeback) धाडले.
त्याच्या या सामन्यातील एकूण प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, त्याने ३.९०च्या इकोनॉमीने ७ षटके गोलंदाजी करताना २७ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. चाहरबरोबरच अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनीही प्रभावित केले. दोघांनीही प्रत्येकी ३ विकेट्स काढल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय गोलंदाजीपुढे झिम्बाब्वेचे लोटांगण! अवघ्या ४१ षटकातच झाला सर्वबाद
‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच
बुमराहची अनुपस्थिती झिम्बाब्वेसाठी फायद्याची; धाकड खेळाडू म्हणतोय, ‘आता आमच्यासाठी…’