भारतीय क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहल याची पत्नी जया भारद्वाज हिच्यासोबत मोठी फसवणूक झाली आहे. आर्थिक फसवणुकीसोबतच जयाला धमकावण्याचा प्रयत्न देखील आरोपींकडून केला गेला. जयाला जीवे मारण्याची धमकी या दोन व्यक्तिंकडून मिळाली आहे. यासंदर्भात दीपक चाहरचे वडील आणि जया भारद्वाजचे सासरे लोकेंद्र चाहर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार जया भारद्वाज हिने एका बिजनेससाठी या दोन व्यक्तिंना ठराविक रक्कन दिली होती. पण काही कारणास्तव तिने ही रक्कम मागारी मागितल्यानंतर या व्यक्तिंकडून तिला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. माहितीनुसार जयाला धमकी देणारे दोन व्यक्ती म्हणजे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे माजी अधिकारी आणि त्यांचा मुलगा आहे. सांगितले जात आहे की जयाने नवीन बिजनेस सुरू करण्यासाठी या दोघांकडे 10 लाख रुपये दिले होते, जे तिला परत करण्यात आले नाहीत.
पारिख स्पोर्ट्स एन्ड शॉपचे मालिके घ्रुव पारिष आणि त्यांचे वडील कमलेश पारिख यांच्यासोबत पार्टनरशिप पार्टनरशिप करण्याच्या हेतूने ही रक्कम त्यांना दिली होती. पण नंतर काही कारणास्तव करार रद्द झाला. जयाने तिचे पैसे मरत मागितल्यानंतर मात्र कमलेशने आणि त्यांचा मुलका जयासोबत चुकीच्या शब्दांमध्ये बोलले. याच वेळी त्या दोघांनी जयाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पोलिसांकडे एफआयआर केल्यानंतर या प्रकरणात तपास सुरू झाला आहे.
दरम्यान, मागच्या वर्षी दीपक चाहर आणि जया भारद्वाच यांचे लग्न एक चर्चेचा विषय ठरला होता. सध्या या दोगांची लव्ह स्टोरी पुन्हा चर्चेत आली आहे. आयपीएल 2021 मध्ये दीपक चाहर चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळत होता. चाहरने सीएसकेसाठी खेळलेल्या एका सामन्यानंतर थेट स्टॅन्समध्ये जाऊन फिल्मी स्टाईमध्ये जयाला लग्नासाटी मागणी घातली होती. 2021 मध्ये सीएसकेसाठी चमकदार कामगिरी केलेला दीपक चाहर मागच्या मोठ्या काळापासून क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहे. दुखापतीमुळे त्याने मागच्या वर्षभरातील बहुतेक सामने गमावले आहेत. आयपीएल 2022 च्या संपूर्ण हंगामात एकही सामना चाहर खेळू शकला नव्हता. (Deepak Chahar’s wife Jaya Bhardwaj was cheated of 10 lakhs and she also received death threats.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेट लवकरच होणार मोठा बदल, लाल चेंडूने खेळताना येत आहेत अडचणी
सानिया मिर्झानंतर शोएब मलिकही घेतोय निवृत्ती? मैदानात मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’