भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) हे दोन्ही संघ लवकरच वनडे आणि टी२० मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये दीपक हुड्डाचा (Deepak hooda) देखील समावेश आहे. आता निवड झाल्यानंतर त्याने आपल्याला घडविण्यात कोणी महत्वाची भूमिका बजावली आहे? याचा खुलासा केला आहे.
दीपक हुड्डाने आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज आणि देशतार्गत स्पर्धेत राजस्थान संघासाठी अप्रतिम कामगिरी केली होती. चार वर्षांपूर्वी झालेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याची भारतीय टी२० संघात निवड करण्यात आली होती. परंतु त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती.
व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये ।
दीपक हुड्डाने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “लोकांना खूप आश्चर्य व्हायचे. परंतु इरफान पठाण (Irfan Pathan) नेहमी मला एकच गोष्ट सांगायचे, अपना टाईम आएगा. मी हळू हळू इरफान भाई आणि युसुफ भाईच्या (Yusuf Pathan) जवळ जाऊ लागलो. त्यांनी मला शांत कसं राहायचं हे शिकवलं. त्यावेळी मला शांत राहण्याची ताकद काय असते हे कळालं. युवा असल्याने अस्वस्थ होणे स्वाभाविक होते आणि मीही त्याला अपवाद नव्हतो. त्यामुळे माझ्या खेळात अडथळा येत होता. गरज नसलेल्या गोष्टी मी अधिक करण्याचा प्रयत्न केला.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला आठवण आहे की, इरफान भाई मला तयारी आणि प्रक्रियेचे महत्व समजावून सांगायचे. जिम असेल, नेट सराव असेल किंवा डायट फॉलो करणं असेल, मी या सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या. मी अनेक उतार चढाव पाहिले आहेत आणि सर्वांना माहीत आहे की, बडोदामध्ये काय झालं होतं. मी गतवर्षी राजस्थानमध्ये गेलो होतो. हा माझ्यासाठी एक नवीन प्रवास होता. परंतु राजस्थानने माझे चांगल्या प्रकारे स्वागत केले. आता मेहनतीचं फळ मिळू लागलं आहे. मला सुरुवातीला काहीच उत्तर मिळालं नाही की, माझी निवड का झाली आणि मला का काढण्यात आलं?. मला जाणून घ्यायचे होते की, माझी निवड का झाली नव्हती?. मी खूप दुखावलो होतो.”
“मी अनिल (अनिल कुंबळे) भाईंचे आभार मानतो की, त्यांनी २ वर्ष मला पंजाब किंग्ज संघासाठी खेळण्याची संधी दिली. तिथल्या लोकांनी पाहिलं की, माझ्यात अजून खूप काही शिल्लक आहे. मी नेहमीच स्वतःला पाठिंबा दिला आहे. माझ्यावर विश्वास ठेवला. स्वतःला म्हटले की, शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करा,” असे दीपक हुड्डा म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :
नेदरलॅंडच्या सर्वात यशस्वी फलंदाजाचा २९ व्या वर्षी क्रिकेटला रामराम; ट्विटरवरून केली घोषणा
हे नक्की पाहा: