आशियाई गेम्स 2023चा शेवटचा 14वा दिवस भारतासाठी खास ठरला. भारताने शनिवारी (7 ऑक्टोबर) चार सुवर्ण पदके जिंकली. पण कुस्तीमध्ये दीपक पुनिया देशासाठी सुवर्ण पदक जिंकू शकला नाही. 86 किलो वजनी गटात दीपक पुनिया अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. पण ईरानचा कुस्तीपटू हसन यझदानी याने अंतिम सामन्यात दीपकला 0-10च्या फरकाने मात दिली. परिणामी कुस्तीमध्ये भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
तत्पूर्वी शनिवारी (7 ऑक्टोबर) भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाची कामई केली. भारतीय पुरुष क्रिकेट संघानेही अंतिम सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध विजय न मिळवता सुवर्ण पदक जिंकले. पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. पण गुणातालीकेतील स्थानाच्या जोरावर भारताने सुवर्ण मिळवले. तसेच बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये सात्विक आणि चिराग यांनी देखील सुवर्ण पदक जिंकले. एकंदरीत पाहता शनिवार भारतासाठी महत्वपूर्ण ठरला. कारण भारताला आशियाई गेम्समध्ये मिळालेल्या पदकांची संख्या शनिवारी 100 पूर्ण झाली. इतिहासात पहिल्यांत आशियाई गेम्समध्ये भारताने 100 पदकांची कमाई केली आहे. (Deepak Punia won a silver medal in the Asian Games 2023)
महत्वाच्या बातम्या –
भले शाब्बास! सात्विक-चिरागने घडवला इतिहास, Asian Gamesमध्ये बॅडमिंटन खेळात भारताने पहिल्यांदाच जिंकले Gold
BREAKING: क्रिकेटमध्येही यंग इंडियाने कमावले गोल्ड, ऋतुराजच्या नेतृत्वात घडला इतिहास