टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) महिला तिरंदाजीतील उपउपांत्यपूर्व फेरीच्या एकेरी गटात राऊंड ८ मधील सामना भारत आणि रशिया संघात पार पडला. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या दीपिका कुमारीने या सामन्यात रशियाच्या सेनिया पेरोवाचा ६-५ असा सहज पराभव केला. तसेच तिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
दीपिकाने सेनियाला पहिल्या सेटमध्ये २८-२५ ने पराभूत केले. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सेनियाने जबरदस्त पुनरागमन करत दीपिकाला २७-२६ने पराभूत केले. यानंतर दीपिकाने तिसरा सेटही २८-२७ ने जिंकला. चौथ्या सेटमध्ये दोघींनीही २६-२६ बरोबरी साधली. यानंतर पाचव्या सेटमध्ये सेनियाने २८-२५ ने खिशात घातला. (Deepika Kumari defeats Ksenia Perova, and she does it with a 10 in the shootof)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Archery
Women's Individual 1/8 Eliminations ResultsArcher @ImDeepikaK moves past Ksenia Perova to progress into the QFs. A hard fought shoot-off decided the result. #WayToGo champ! 👏🙌🏹#RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/fVrtgKffUR
— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2021
मात्र, शूटऑफमध्ये दीपिकाने चमकदार कामगिरी करत १० गुण मिळवले, तर सेनियाने ७ गुण मिळवले. त्यामुळे दीपिकाने हा सामना खिशात घातला आहे.