पॅरीस। फ्रेंच ओपन 2018 स्पर्धेच्या पुरूष एकेरी गटात आज जुआन मार्टिन डेल पोट्रो विरुद्ध मारीन चिलिच यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतील सामना पार पडला. या सामन्यात अर्जेंटीनाच्या डेल पोट्रोने तिसऱ्या मानांकित चिलिचचा 6-7(5-7),7-5,3-6,5-7 अशा फरकाने पराभव केला.
या सामन्याला काल सुरवात झाली होती. परंतू पावसाचा व्यत्यय आल्याने उर्वरित सामना आज पूर्ण करण्यात आला.
या विजयामुळे डेल पोट्रोने एटीपी क्रमवारीत चौथे स्थान पक्के केले आहे. तो 2014 नंतर पहिल्यांदाच एटीपी क्रमवारीत पहिल्या चारमध्ये आला आहे.
चिलिच आणि डेल पोट्रोमध्ये आत्तापर्यंत झालेल्या 13 सामन्यांपैकी डेल पोट्रो 11 तर चिलिचने 2 सामने जिंकले आहेत. तसेच यातील क्ले कोर्टवर पार पडलेल्या पाचही सामन्यात डेल पोट्रोने बाजी मारली आहे.
आज झालेल्या सामन्यात या दोघांमध्ये चांगली झुंज पाहायला मिळाली. पहिला सेटमध्ये विजय मिळवण्यासाठी चिलिचने डेल पोट्रोला चांगली लढत दिली होती. परंतू डेल पोट्रोने यात बाजी मारली.
दुसऱ्या सेटमध्ये क्रोएशियाच्या चिलिचने चांगले पुनरागमन केले होते. त्याने हा सेट जिंकून सामना बरोबरीत आणला होता. परंतू त्यानंतर मात्र डेल पोट्रोने सामन्यात वर्चस्व राखत सामन्यात विजय मिळवत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली.
याआधी 2009 मध्ये त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. त्यावेळी त्याला रॉजर फेडररने त्याला पराभूत केले होते.
डेल पेट्रोचा आजचा या वर्षातला सलग 15 वा विजय होता. तसेच त्याने फ्रेंच ओपन व्यतिरिक्त ग्रँड स्लॅम स्पर्धेत 2009 ची अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे. त्याचबरोबर 2013ची विंबल्डन ओपन आणि 2017ची अमेरिकन ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे.
डेल पेट्रोचा फ्रेंच ओपन 2018च्या उपांत्य फेरीतील सामना अव्वल मानांकित राफेल नदालशी होणार आहे. नदालने आज अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्टझमॅनचा उपांत्यपूर्व फेरीत 4-6, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–तब्बल ११व्यांदा क्ले कोर्टचा किंग राफेल नदाल फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत
–विजयाच्या हॅट्रिकसह भारत करणार का अंतिम फेरीतील स्थान निश्चित?
–फिफा विश्वचषक 2018: जर्मनीला विश्वचषकापुर्वीच मोठा धक्का, मेसूत ओझिलला दुखापत
–अर्जून तेंडूलकरची भारतीय संघात निवड, १९ वर्षाखालील टीम इंडियासोबत करणार श्रीलंका दौरा
–अमेरिकन ओपनच्या विजेत्या आणि उपविजेत्या आज फ्रेंच ओपनमध्ये आमने-सामने