महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 2 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 164 धावा केल्या, प्रत्युत्तरात दिल्लीने शेवटच्या चेंडूवर दोन धावा केल्या आणि २ विकेट्सने त्यांचा विजय निश्चित केला. ज्यात अंडर-19 संघाची कर्णधार निकी प्रसादने (354 धावा) निर्णायक खेळी खेळली
हा सामना वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली. मुंबईकडून नॅट सायव्हर ब्रंटने नाबाद 80 धावा केल्या तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 42 धावांचे योगदान देऊन मुंबईला 164 धावांपर्यंत पोहोचवले. धावांच्या बाबतीत मुंबईच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दिल्लीकडून अॅना सदरलँडने सर्वाधिक 3 तर शिखा पांडेनेही 2 विकेट्स घेतल्या.
165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खूप चांगली झाली. कॅप्टन मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी पॉवर प्लेमध्येच संघाचा स्कोअर 60 च्या पुढे नेला. लॅनिंग 15 धावा काढून बाद झाली, तर शेफालीने फक्त 18 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 43 धावा केल्या. मधल्या षटकांमध्ये दिल्ली विजयापासून दूर जात असल्याचे दिसत होते. पण निक्की प्रसादने 33 चेंडूत 35 धावांची संथ पण महत्त्वाची खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले.
शेवटच्या षटकांमध्ये धावबाद होण्यासाठी अनेक अपील झाले, पण दिल्लीच्या नशिबात विजय लिहिला गेला. सारा ब्राइसने 10 चेंडूत 21 धावांची छोटी खेळी केली. शेवटच्या चेंडूवर दिल्लीला 2 धावांची आवश्यकता होती. अरुंधती रेड्डीने चेंडू मारला आणि राधा यादवही तिच्यासोबत दुसऱ्या धावण्यासाठी धावली. दिल्लीसाठी चांगली गोष्ट म्हणजे अरुंधती रेड्डीची बॅट वेळेत पांढऱ्या रेषेच्या आत आली. पण पंचांचा हा निर्णय वादग्रस्त ठरत आहे. अशाप्रकारे, महानगरांच्या संघर्षात दिल्लीचा विजय झाला.
Remove your Zing Bails. Proper mockery of the game by Third Umpire.
3 Run out came against us. #WPL2025 #TATAWPL pic.twitter.com/M9gYc8zHA4
— Mumbai Indians FC (@MIPaltanFamily) February 15, 2025
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोहम्मद आमिरचा बाबर आझम आणि पाकिस्तान संघाबाबत मोठा खुलासा!
WPL; अटीतटीच्या लढतीत दिल्लीचा शानदार विजय! मुंबईचा 2 विकेट्सने पराभव