भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांची कसोटी मालिका १-२ ने गमावली आणि त्यानंतर शनिवारी (१५ जानेवारी) भारताचा महान फलंदाज विराट कोहली (Viart Kohli)ने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदावरुन पायउतार (Virat Kohli Resigns) होण्याची घोषणा केली. कोहलीच्या या निर्णयानंतर भारतीय संघ व्यवस्थापन नव्या संघनायकाच्या शोधात आहे. कसोटी कर्णधारपदाच्या शर्यतीत रोहित शर्मा आघाडीवर आहे. परंतु रोहित कर्णधार झाल्यास उपकर्णधाराची निवडही महत्वाची ठरेल. कसोटी संघाच्या उपकर्णधारपदासाठी केएल राहुल आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे.
याचदरम्यान दिल्ली कॅपिटल्सचे सह-संघ मालक (Delhi Capitals Co-Owner) पार्थ जिंदाल (Parth Jindal) यांनी पंतला उपकर्णधार बनवण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी माजी भारतीय कसोटीपटू सुनिल गावसकर आणि अष्टपैलू युवराज सिंग यांनीही पंतला उपकर्णधारपदाचा दावेदार म्हटले होते.
व्हिडिओ पाहा- क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा
पंतच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीचा संघ आयपीएल २०२१ मध्ये चांगला खेळला आणि त्यांनी प्लेऑफपर्यंतचा प्रवासही केला होता. तो सध्या भारताच्या वनडे, टी२० आणि कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. अशात बीसीसीआय त्याच्यावर विश्वास ठेवू शकते, असे जिंदाल यांचे म्हणणे आहे.
येत्या काळात भारतीय संघाने नेतृत्त्वपदाबाबत काय करायला पाहिजे?, याबद्दल जिंदाल यांनी ट्वीट करत बीसीसीआयला सल्ला दिला आहे. त्यांनी लिहिले आहे की, रिषभ पंतला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवून त्याला नेतृत्त्वासाठी तयार करणेच सर्वश्रेष्ठ असेल. पुढील १-२ वर्षांसाठी रोहित शर्मा किंवा आर अश्विनला कर्णधार बनवले गेले पाहिजे. त्यानंतर योग्यवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही स्वरुपातील सर्वोत्कृष्ट खेळाडू असलेल्या पंतच्या हाती संघाची सुत्रे येतील.
Appointing @RishabhPant17 the Vice Captain of the test team and grooming him for the job would be the best thing to do in my opinion,in the interim having someone like @ImRo45 or @ashwinravi99 lead for two years and then hand over to Pant who is an all format player would be best
— Parth Jindal (@ParthJindal11) January 18, 2022
पंतला कर्णधाराच्या पाहू इच्छितात गावसकर
यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावस्कर म्हणाले होते की, “२४ वर्षीय रिषभ पंतने मला प्रभावित केले आहे आणि त्याच्याकडे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपवले पाहिजे.” गावस्कर मन्सूर अली खान पतौडी यांचे उदाहरण देत पंतला कर्णधारपद देण्याबाबत बोलले आहेत. गावस्कर म्हणाले की, “पतौडीला खुप कमी वयात कर्णधारपद दिले होते आणि त्याने खुप यश मिळवले होते, तसेच पंतसुद्धा करु शकतो.”
पूढे गावस्कर म्हणाले, “तुम्ही मला विचाराल तर मी पंतला भारतीय संघाचा पुढचा कर्णधार बनवू इच्छितो. कारण रिकी पाँटिंगच्या जागी रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्यानंतर रोहितच्या फलंदाजीत काय बदल झाला? हे तर आपण सर्वांनीचं पाहिले आहे. कर्णधार झाल्यानंतर त्याला जबाबदारीची जाणीव झाली, त्याने ३०, ४० आणि ५०धावांचे डाव १००, १५० आणि २०० मध्ये बदलण्यास सुरुवात केली.”
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला मिळाला रिजवानचा उत्तराधिकारी!! विश्वचषकात १० चौकारांसह चोपल्यात १३५ धावा
उन्मुक्त चंदने रचला इतिहास!! ‘असा’ कारनामा करणारा ठरलाय पहिलाच भारतीय क्रिकेटर
सहावा गोलंदाज खेळवणार? कर्णधार राहुलने सांगितला व्यंकटेश अय्यरबाबतचा प्लॅन
हेही पाहा-