आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार रिषभ पंत खेळत नाहीये. पंतच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नर दिल्लीच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. तसेच अष्टपैलू अक्षर पटेल संघाच्या उपकर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. आयपीएलला अवघ्या काही दिवसांचे अंतर असताना दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग याने माध्यमांशी चर्चा केली. यावेळी पाँटिंगने अक्षरला उपकर्णधार बनवण्याचे कारण स्पष्ट केले.
दरम्यान, अक्षर पटेल (Axar Patel) आयपीएल 2022 मध्येही दिल्ली कॅपिटल्सच्या उपकर्णधाराच्या रूपात खेळला होता. यावर्षी पंत संघातून बाहेर असल्यामुळे डेविड वॉर्नर (David Warner) दिल्ल कॅपिटल्सचा कर्णधार आहे. अक्षर पटेलला संघाचे उपकर्णधारपद सोपवण्याविषयी प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting ) याला पत्रकारांनी प्रश्न विचारला. पाँटिंग या प्रश्नावर उत्तर देत म्हणाला की, “अक्षर पटेल मागच्या वर्षीही आमचा उपकर्णधार होता. एकादा खेळाडू फ्रँचायझीसोबत मोठ्या काळापासून खेळत आला असेल, तर आम्ही त्याला सन्मान देत असतो. अक्षर या आयपीएलमध्ये सर्वोत्तम खेळाडूंमध्ये सर्वात वरती असेल. तो असल्यानंतर संघात चांगले वातावरण राहते. तो एक चांगला खेळाडू आहे आणि त्याचा अनुभव देखील मोठा आहे. त्यामुळेच त्याला उपकर्णधार बनवण्याचा निर्णय अगदी योग्य आहे.”
अशी असणार दिल्लीची वरची फळी
यावेळी पाँटिंगने अशी माहितीही दिली की, डेविड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीवीर म्हणून खेळेल आणि पृथ्वी शॉ त्याच्या साठीने डााची सुरुवात करेल. पाँटिंग म्हणाला की, “डेविड वॉर्नर सोबत पृथ्वी शॉ सलामीला फलंदाजी करेल. तिसऱ्या क्रमांकावर मिचेल मार्च फलंदाजीला येईल. कारण त्याचे अलिकडच्या काळातील प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी मार्श असेच प्रदर्शन करण्याची अपेक्षा आहे.” दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा आगामी आयपीएलमधील पहिला सामना 1 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळायचा आहे.
(Delhi Capitals head coach Ricky Ponting gave the reason for making Axar Patel the vice-captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 25व्या वर्षी या खेळाडूंनी गाजवली आयपीएल, विराट-रोहितसह सर्वच्या सर्व भारतीयच
‘मला त्याचा इतका राग आलेला, जेवढा त्रिशतक हुकल्यानंतरही आला नव्हता’, सेहवागचे विराटबाबत खळबळजनक भाष्य