नवी दिल्ली। इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील दुसरा क्वालिफायर सामना रविवारी (8 नोव्हेंबर ) झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव केला. हा सामना जिंकून दिल्लीने आयपीएलच्या 13 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे सोशल मीडियावर दिल्ली कॅपिटल्सचीच चर्चा होतेय.
दिल्लीने केल्या 189 धावा
दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक 78 धावा केल्या. यामध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी युवा फलंदाज हेटमायरने डावाच्या अखेरच्या काही षटकांत 42 धावांची आक्रमक खेळी केली. या फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीला 189 धावा करता आल्या.
हैदराबादचा झाला पराभव
प्रत्युत्तरादाखल हैदराबादची सुरुवात खराब झाली. कर्णधार डेविड वॉर्नर फक्त 2 धावा करून तंबूत परतला. या संघांने अवघ्या 44 धावांवर 3 बळी गमावले होते. अनुभवी फलंदाज केन विलियम्सनने 45 चेंडूत 67 धावांची उत्कृष्ट खेळी केली. युवा फलंदाज अब्दुल समदनेही (16 चेंडू, 33 धावा) त्याला उत्तम साथ दिली. मात्र, सामना जिंकवून देण्यात ते अपयशी ठरले. संघाला 20 षटकांत केवळ 172 धावाच करता आल्या.
दिल्लीने अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी संघाचे कौतुक केले आहे आणि शुभेच्छाही दिल्या आहेत.
Congratulations #DelhiCapitals on reaching the finals. The only active IPL team to have not ever played a final makes it to the final. 2020… Aur bahut kuch dikhayega.#DCvSRH pic.twitter.com/M80Mth8B8J
— Virender Sehwag (@virendersehwag) November 8, 2020
Thrilled for the boys to make it through to @delhicapitals first IPL final, it's a great reward for all the hard work they've put in since we got here and gelled together as a group. One more step to go. pic.twitter.com/zAhhax9bBw
— Ricky Ponting AO (@RickyPonting) November 8, 2020
Well done Team #DelhiCapitals for making it to the first-ever #IPL2020 final, well deserved! @KagisoRabada25 @MStoinis @SDhawan25 and captain @ShreyasIyer15 deserve credit for this win tonight #DCvSRH #cricket
— Mohammad Kaif (@MohammadKaif) November 8, 2020
Congratulations boys ! You made it to the finals. Fantastic team effort. I am super delighted. On to the next one !Bring the trophy home 🏆. @DelhiCapitals#WeRoarTogether #Dream11IPL
— Amit Mishra (@MishiAmit) November 8, 2020
Sheer joy 💙💙 https://t.co/krqPjBg4Dg
— Delhi Capitals (@DelhiCapitals) November 8, 2020
Boys we did it 👏👏👏@DelhiCapitals finally made it to the finals!!
I’m overwhelmed with joy right now! Maximum team effort!! What a wonderful, well deserved win!! 💙🙌
On to the next one!! 💪 #DelhiCapitals #SRHvsDC
— Ishant Sharma (@ImIshant) November 8, 2020
मुंबई इंडियन्स विरुद्ध होईल अंतिम सामना
दिल्लीचा अंतिम सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. हा सामना बुधवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी 7:30 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर
-RCB आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराटने बदललं वास्तव्य; पाहा काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
-RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा