आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने सुरुवात झाली आहे. सोमवारी (२० सप्टेंबरला) कोलकाता नाईट रायडर्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघात सामना होणार आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानावर खेळाडूंचे दमदार प्रदर्शन तर पाहायला मिळू शकते, पण मैदानाबाहेरही काही खेळाडू चाहत्यांसाठी मनोरंजनाची सोय करत आहेत. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचे दोन महत्वाचे खेळाडू, शिखर धवन आणि पृथ्वी शाॅ हे आघाडीवर दिसतात. दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिखर धवनने रविवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅंडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूपच आवडत आहे. या मजेदार व्हिडिओत पृथ्वी शाॅ आणि शिखर धवन, हे दोघे दिसत आहेत. या दोघांनी सध्या चर्चेत असलेले ‘मणी….पोहे बनेंगे’ या मीमवर हा व्हिडिओ बनवला आहे. दोघे या व्हिडिओमध्ये शार्ट्समध्ये दिसत आहेत.
चाहत्यांमध्ये या दोघांचा हा अंदाज खूप पसंत केला जात असून व्हिडिओला इंस्टाग्रामवर तीन तासांत चार लाख लोकांनी लाइक केले आहे. त्यांच्या या व्हिडिओवर श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, मोहित शर्मा अशा काही क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.
https://www.instagram.com/p/CT_tJt6h7yn/
या दोघांनी यापूर्वीही मजेदार आणि व्हायरल व्हिडिओ तयार केले आहेत आणि चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे दोघे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे खेळाडू असून सलामीवीराची भूमिका पार पाडतात. नजीकच्याच काळात पार पडलेल्या भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात यांचा भारतीय संघात समावेश होता. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध सामन्यांतही संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. असे असले तरी या दोघांनीही आगामी टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही.
दरम्यान, आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या पहिल्या स्थानावर आहे. संघाच्या या कामगिरीचे मोठे योगदान सलामीवीर जोडी पृथ्वी शाॅ आणि शिखर धवन यांचेही आहे. दोघांनी आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात चांगेले प्रदर्शन केले असून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीतही सामील झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित-हार्दिक दुसऱ्या सामन्यात खेळणार का? कोच जयवर्धनेंनी दिल ‘हे’ उत्तर
“विराटची नेतृत्व सोडण्याची वेळ चुकली”; आयपीएल विजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया
जायबंदी रायुडू पुढील सामन्यात खेळणार का? धोनीने दिले ‘हे’ उत्तर