आयपीएल 2023 स्पर्धेचा 11वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान राजस्थान रॉयल्सने दिल्लीला एकतर्फी नमवले. दिल्लीचा स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव ठरला. त्यांना अजूनही आपल्या गुणांचे खाते खोलता आले नाही. संघाच्या या सलग पराभवानंतर दिल्लीचे संघमालक पार्थ जिंदाल हे निराश दिसले.
गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात दिल्ली संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. सुरुवातीला राजस्थान रॉयल्सने त्यांच्यासमोर तुफानी फलंदाजी करत 200 धावांचे लक्ष ठेवले. त्यानंतर फलंदाजही अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. परिणामी संघाला 57 धावांनी पराभूत व्हावे लागले. संघाच्या या अपयशानंतर दिल्लीचे संघमालक व जेएसडब्ल्यू ग्रुपचे प्रमुख पार्थ जिंदाल यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिले,
3 games, 3 losses – very tough to see this @DelhiCapitals – not enough intent with the bat and execution lacking in some areas in the field – we have the belief in this bunch – let’s regroup and start fresh from Tuesday – I believe in this team. Come on Delhi!
— Parth Jindal (@ParthJindal11) April 9, 2023
‘तीन सामने आणि तीन पराभव हे पाहणे निराशाजनक आहे. फलंदाज हवी तशी कामगिरी खेळाडू करतानाच दिसत नाहीत. तसेच आखलेल्या योजनांची मैदानात अंमलबजावणी देखील झाली नाही. आम्हाला या संघावर विश्वास आहे. चला पुन्हा एकत्र होऊयात. दिल्लीमध्ये मंगळवारपासून मी सुरुवात करू.’
दिल्लीची सुरुवात या हंगामात अपेक्षित होऊ शकली नाही. नियमित कर्णधार रिषभ पंत हंगामातून बाहेर झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर संघाचे नेतृत्व करतोय. दिल्लीला आपल्या पहिल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने मात दिली होती. त्यानंतर गुजरात टायटन्सने दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात राजस्थानी त्यांना पराभूत केल्याने संघाची पुढील वाटचाल खडतर होऊ शकते. दिल्लीला चौथा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली येथे खेळायचा आहे.
(Delhi Capitals Owner Parth Jindal Tweet After Teams Three Consecutive Loss)