---Advertisement---

आयपीएल 2023 पूर्वी दिल्लीने खेळला मोठा डाव, ‘या’ मॅचविनर खेळाडूला धाडले कोलकाताच्या गोटात

On: सोमवार, नोव्हेंबर 14, 2022 3:52 PM
Kuldeep-Yadav-And-Shardul-Thakur
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी टी20 लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थातच आयपीएल 2023 स्पर्धासाठी संघ सज्ज झाले आहेत. आयपीएल 2023ची सुरुवात मार्च 2023मध्ये होणार आहे. मात्र, स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. या स्पर्धेसाठी आयपीएलचा छोटा लिलाव (मिनी ऑक्शन) काही आठवड्यांनंतर होणार आहे. अनेक फ्रँचायझी आगामी हंगामासाठी काही खेळाडूंना रिटेन करत आहे, तर काही खेळाडूंना खराब फॉर्ममुळे बाहेरचा रस्ताही दाखवत आहे.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघापाठोपाठ आता दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या संघानेही काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाचा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हा आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून खेळताना दिसू शकतो.

शार्दुल ठाकूर होणार केकेआरमध्ये सामील
आयपीएल 2022च्या मेगा लिलावात शार्दुल ठाकूर याच्यावर मोठी बोली लागली होती. दिल्ली संघाने मोठ्या शर्यतीनंतर 10.75 कोटी रुपयांच्या मोठ्या रक्कमेत शार्दुलला ताफ्यात सामील केले होते. त्याने मागील वर्षी स्पर्धेत 14 सामने खेळताना 15 विकेट्स घेतल्या होत्या, परंतु यादरम्यान त्याने 9.79च्या इकॉनॉमी रेटने धावाही खर्च केल्या. दुसरीकडे फलंदाजी करताना त्याने 15च्या सरासरीने फक्त 120 धावाच केल्या होत्या.

माध्यमांतील वृत्तांनुसार, शार्दुल ठाकूर याला दिल्ली संघाने मिनी ऑक्शनपूर्वी मुक्त केले आहे. अशात शार्दुल ऑक्शनमध्ये सामील होणार नाही. कारण, ट्रेड विंडोअंतर्गत तो केकेआर (KKR) संघात सामील झाला आहे. तसेच, आयपीएल 2023 स्पर्धेत शार्दुल हा केकेआर संघाकडूनच खेळताना दिसणार आहे.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1592081185932730368

आयपीएल 2022मधील दिल्लीची कामगिरी
दिल्ली कॅपिटल्स संघाने एकूण 14 सामने खेळले होते. यातील फक्त 7 सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले होते. यामुळे त्यांना अंतिम 4मध्ये स्थानही मिळवता आले नव्हते. त्यांना पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. यावेळी त्यांचे गुण 14 होते. तसेच, त्यांचा नेट रनरेट हा +0.204 इतका होता. (Delhi Capitals Release All Rounder Shardul Thakur in IPL 2023 to Kolkata Knight Riders)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: कॅप्टन असावा तर जोस बटलरसारखा! सेलिब्रेशनपूर्वी रशिद, मोईनला केले सतर्क; कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित
जाफर रॉक्स! धोनीच्या डायलॉगचा वापर करत केला पाकिस्तानचा अपमान, चाहते झाले लोटपोट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---