भारताचा फिरकीपटू आर अश्विन 2018 आणि 2019 च्या आयपीएल मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. पण आता तो 2020 च्या आयपीएल मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळण्याची शक्यता आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली संघ अश्विनला पंजाब संघाबरोबर ऑलकॅश डील करुन संघात सामील करुन घेणार आहेत. अश्विनला पंजाबने 2018 मध्ये आयपीएल लिलावात 7.6 कोटी रुपयांची बोली लावत संघात सामील करुन घेतले होते. तसेच याच मोसमात त्यांनी त्याला कर्णधारपदाची जबाबदारीही दिली होती.
तसेच अश्विनमध्ये दिल्ली संघाबरोबरच एकाक्षणी सनरायझर्स हैद्राबादनेही रुची दाखवली होती. परंतू नंतर याबद्दल पंजाब आणि हैद्राबाद संघात पुढे जास्त चर्चा झाली नाही.
जर दिल्लीने 2020 आयपीएलसाठी अश्विनला संघात घेतले तर दिल्ली हा अश्विनचा आयपीएलमधील चौथा संघ ठरेल. याआधी अश्विन चेन्नई सुपर किंग्स, रायझिंग पुणे सुपरजायन्ट्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे.
अश्विनने पंजाबसाठी 2018 आणि 2019 या दोन मोसमात मिळून 28 सामने खेळले. यामध्ये त्याने 25 विकेट्स घेतल्या. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब संघ 2018 आणि 2019 मोसमात गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिला.
त्याचबरोबर 2020 च्या मोसमासाठी किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या नेतृत्वाची धूरा केएल राहुलकडे सोपवण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–दुसऱ्या कसोटीतील ‘सामनावीर’ हनुमा विहारीला रवी शास्त्रींनी दिला होता हा सल्ला
–हा खेळाडू म्हणतो, स्टोक्समुळे माझी रात्रीची झोप उडाली
–आजपासून सुरु होणाऱ्या चौथ्या ऍशेस कसोटीसाठी असा आहे इंग्लंडचा ११ जणांचा संघ