मुंबई। बुधवारी (११ मे) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ५८ वा सामना डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. हा सामना दिल्लीने ८ विकेट्सने जिंकला. पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीपासूनच दिल्लीचे खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये होते. त्यांनी चक्क संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग याची चेष्टा केली होती. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) बुधवारी सामन्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, दिल्लीचे खेळाडू आणि अन्य सदस्य बसमध्ये बसण्यासाठी जात आहेत. त्यानंतर बसमध्ये खेळाडू बसल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) त्याची बॅग आणि हातात कॉफी घेऊन येतो. तो जसा बसमध्ये प्रवेश करतो, तसे खेळाडू एकत्र मिळून भारतीय गायक कैलाश खेर यांचे प्रसिद्ध गाणे ‘सैयाँ’ हे गाणे गातात आणि पाँटिंगचे स्वागत करतात.
हे गाणे ऐकताच पाँटिंग सुरुवातीला चकीत होतो, पण खेळाडूंनी केलेली ही थट्टा पाहून तोही हसून बसमध्ये त्याच्या जागेवर बसण्यासाठी जातो (Welcome in Bus). या व्हिडिओला सध्या चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.
A Super 𝑺𝒆𝒊-yaaaaan welcome for the Boss 😂💙#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #RRvDC#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | #DCAllAccess | @RickyPonting | @TajMahalMumbai | #OctaRoarsForDC pic.twitter.com/CeTZUDP4JB
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 11, 2022
करो वा मरोच्या सामन्यात दिल्लीचा विजय
दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) संमिश्र झाली आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सविरुद्धचा विजय त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. या सामन्यात जर ते पराभूत झाले असते, तर त्यांच्या प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याच्या आशेला मोठा धक्का बसला असता. पण, हा सामना जिंकून त्यांनी प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत ठेवले आहे.
बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने २० षटकात ६ बाद १६० धावा केल्या. त्यानंतर दिल्लीने १८.१ षटकात २ विकेट्स गमावत १६१ धाव करून सामना जिंकला. दिल्लीकडून मिशेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ६२ चेंडूत ८९ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ७ षटकार मारले. तसेच डेव्हिड वॉर्नरने ४१ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली.
दिल्लीचा आयपीएल २०२२ हंगामातील हा ६ वा विजय मिळवला आहे. सध्या या ६ विजयांसह ते गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर आहेत. आता साखळी फेरीतील त्यांचे अद्याप २ सामने बाकी असून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना दोन्ही सामने महत्त्वाचे असणार आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये ‘फ्लॉवर’ समजून बेस प्राईजमध्ये घेतले गेलेले ५ खेळाडू, पण करून दाखवली ‘फायर’ कामगिरी
Video: विजयाचा जल्लोष! वॉर्नरने ‘हाऊज द जोश’ म्हणताच, सहकाऱ्यांनीही मिसळला सुरात सूर
‘बीसीसीआयला भाजप चालवतंय’, खळबळजनक दावा; चर्चांना उधाण