संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यातील ३६ वा सामना शनिवार रोजी (२५ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. अबु धाबी येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने निर्धारित २० षटकात ६ गडी गमावत १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर फक्त १२१ धावा करु शकला. त्यामुळे दिल्लीने ३३ धावांनी हा सामना खिशात घातला.
दिल्लीच्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांनी पावरप्लेमध्येच लियाम लिविंगस्टोन (१ धाव), यशस्वी जयस्वाल (५ धावा) आणि डेविड मिलर (७ धावा) यांच्या विकेट गमावल्या. पुढे महिपाल लोमरोर १९ धावांचे योगदान देत कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर आवेश खानच्या हातून झेलबाद झाला.
पुढे कर्णधार संजू सॅमसनने मोर्चा सांभाळत डावाखेत ७० धावा चोपल्या. ५३ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. परंतु दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही. त्यामुळे राजस्थानचा संघ २० षटकात १२१ धावाच करू शकला.
तत्पूर्वी दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांना विशेष कामगिरी करता आली नाही. धवन ८ धावा तर शॉ १० धावा करुन पव्हेलियनला परतला. पुढे श्रेयस अय्यरने मोर्चा सांभाळत सर्वाधिक ४३ धावा केल्या. कर्णधार रिषभ पंतनेही काही आकर्षक फटके खेळत २४ धावा फटकावल्या. तर शेवटी शिमरॉन हेयमायरने षटकार-चौकारांची बरसात करत २८ धावा जोडल्या.
संघातील आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर ललित यादव (१४ धावा) आणि आर अश्विन (६ धावा) यांनी नाबाद राहत संघाची धावसंख्या १५४ धावांपर्यंत पोहोचवली.
पावरप्लेमध्ये राजस्थानच्या फलंदाजांची नांगी
संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून दिल्ली प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. या आमंत्रणाचा स्विकार करत दिल्लीने निर्धारित २० षटकांत ६ बाद १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पावरप्लेमध्येच राजस्थानची दाणादाण उडाली.
दिल्लीच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेत गोलंदाजी केली. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आवेश खानने राजस्थानचा सलामीवीर लियाम लिंविगस्टोनला अवघ्या १ धावेवर झेलबाद केले. तर लगेचच त्यापुढील चेंडूवर एन्रिच नॉर्किएने यशस्वी जयस्वालला रिषभ पंतच्या हातून झेलबाद केले.
त्यानंतर फिरकीपटू आर अश्विनने ४.२ षटकात डेविड मीलरची विकेट घेतली. तो यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून यष्टीचीत झाला. अशाप्रकारे पावरप्लेमध्ये राजस्थानने ३ विकेट्सच्या नुकसानावर फक्त १९ धावा फलकावर लावल्या आहेत.
Another one bites the dust! ☝️@DelhiCapitals are on a roll here. 👍 👍@ashwinravi99 strikes as @RishabhPant17 continues to make things happen behind the stumps! 👌 👌 #VIVOIPL #DCvRR
Follow the match 👉 https://t.co/SKdByWvPFO pic.twitter.com/Jy8s24ITc4
— IndianPremierLeague (@IPL) September 25, 2021
दिल्लीच्या २० षटकात १५४ धावा
राजस्थानला विजयासाठी १५५ धावांचे आव्हान मिळाले आहे. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांना विशेष कामगिरी करता आली नाही. धवन ८ धावा तर शॉ १० धावा करुन पव्हेलियनला परतला. पुढे श्रेयस अय्यरने मोर्चा सांभाळत सर्वाधिक ४३ धावा केल्या. कर्णधार रिषभ पंतनेही काही आकर्षक फटके खेळत २४ धावा फटकावल्या. तर शेवटी शिमरॉन हेयमायरने षटकार-चौकारांची बरसात करत २८ धावा जोडल्या.
संघातील आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर ललित यादव (१४ धावा) आणि आर अश्विन (६ धावा) यांनी नाबाद राहत संघाची धावसंख्या १५४ धावांपर्यंत पोहोचवली.
A wicket in his final over for @Sakariya55! 👌 👌
He finishes his 4 overs with 2 wickets against his name. 👍 👍 #VIVOIPL #DCvRR @rajasthanroyals
Follow the match 👉 https://t.co/SKdByWvPFO pic.twitter.com/IdEbbYJ97s
— IndianPremierLeague (@IPL) September 25, 2021
पावरप्लेत दिल्लीची ‘पळता भुई थोडी’!
मात्र दिल्लीला पावरप्ले संपायच्या आतच २ मोठे झटके बसले. सुरुवातीला ३.१ षटकात कार्तिक त्यागीने सलामीवीर शिखर धवनला त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्यापुढील पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चेतन सकारियाच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात पृथ्वी शॉ लियाम लिविंगस्टोनच्या हातून झेलबाद झाला. अशाप्रकारे ५ षटकात दिल्लीचा संघ २ बाद २५ धावा अशा स्थितीत आहे. धवन आणि शॉ यांच्यानंतर श्रेयस अय्यर आणि कर्णधार रिषभ पंत फलंदाजीसाठी आले आहेत.
तरबेज शम्सीचे राजस्थानकडून पदार्पण
संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यातील ३६ वा सामना शनिवार रोजी (२५ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. अबु धाबी येथे सुरू असलेल्या सामन्याची भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता नाणेफेक झाली आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानकडून गोलंदाज तरबेज शम्सीचे पदार्पण झाले आहे. तसेच डेविड मिलरलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. तर दिल्लीच्या ताफ्यात फक्त एक बदल करण्यात आला आहे. मार्कस स्टॉयनिसच्या जागी ललित यादवला जागा देण्यात आली आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मिलर, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवातिया, कार्तिक त्यागी, चेतन साकरिया, मुस्तफिझूर रेहमान, तरबेज शम्सी
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ललित यादव, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रआ अश्विन, कागिसो रबाडा, एन्रिच नॉर्किए, आवेश खान