fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

परिवारासोबत घरी बसली होती मेरी कोम, तेवढ्यात दिल्ली पोलीस आले घरी

Delhi Police Celebrate Boxer MC Mary Kom Younger Son Birthday During Lockdown

कोरोना व्हायरसने अवघ्या जगभरात थैमान घातले आहे. भारतातही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. देशाला यापासून वाचविण्यासाठी जवळपास मागील २ महिन्यांपासून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.

अशामध्ये प्रत्येकजण आपापल्या घरात बंद आहे. त्यामुळे त्यांना आपल्या खास दिवशी खास गोष्टी करता येत नाही. परंतु आपले कोरोना योद्धा म्हणजेच पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी या व्हायरसदरम्यान (Corona Virus) लोकांची मदत करण्यासाठी सरसावत आहेत.

यादरम्यान पोलीस वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर सर्वात पुढे राहून या व्हायरसचा सामना करत आहेत. ते लॉकडाऊनमध्ये व्यवस्था नियंंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरोबर दुसरीकडे पोलीस लोकांच्या खास दिवशी त्यांचा क्षण विस्मरणीय बनविण्याचाही प्रयत्न करत आहेत.

याचा प्रत्यय दिल्लीमध्ये ६ वेळा विश्वविजेती बॉक्सिंगपटू एमसी मेरीकॉमच्या (MC Marykom) घरी पहायला मिळाला. ऑलिंपिक मेडलिस्ट आणि राज्य सभा खासदार मेरीकॉमचा सर्वात लहान मुलगा प्रिंससाठी (Prince Kom) हा वाढदिवस नेहमीच अविस्मरणीय राहील. कारण दिल्ली पोलिसांचा एक गट चक्क त्याचा वाढदिवस (Birthday) करण्यासाठी मेरीकॉमच्या घरी पोहोचला होता.

गुरुवारी (१४ मे) प्रिंसने आपल्या वयाची ७ वर्षे पूर्ण केली. त्याने आपला वाढदिवस आपले आई-वडील, दोन मोठे जुडवा भाऊ आणि लहान बहिणीबरोबर तसेच तुगलक रोड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांबरोबर साजरा केला.

मेरीकॉमने या अविस्मरणीय वाढदिवसाचा व्हिडिओ ट्वीट करत लिहिले की, “दिल्लीचे डीएसपी यांना धन्यवाद, ज्यांनी माझा लहान मुलगा प्रिंस कॉमचा वाढदिवस इतका खास बनवला. तुम्ही खरे योद्धा आहात. मी तुमच्या समर्पण आणि वचनबद्धतेबद्दल तुम्हा सर्वांना सलाम करते.”

दिल्ली पोलिसांनी लॉकडाऊनदरम्यान नागरिकांचा विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी हे अभियान सुरु केले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-रोहित, कोहलीमुळे बीसीसीआय वैतागली, मोहम्मद शमीचं मात्र नाही काहीच टेन्शन

-पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज

-वनडेत एकाच सामन्यात १७०पेक्षा जास्त चेंडू खेळणारे ५ खेळाडू

You might also like