भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी, विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांच्या मुलींबाबत सोशल मीडियावर असभ्य ट्विट करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईची तयारी केली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला असून, तपास सुरू केला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या ट्विटनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. यासोबतच ट्विटरला खात्यांची माहिती देण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली.
मेरी नोटिस के बाद दिल्ली पुलिस ने @ImVKohli और @MSDhoni की बेटियों पर हुई अभद्र टिपण्णियों के मामले में FIR दर्ज कर ली है। बहुत जल्द सभी दोषी गिरफ़्तार होंगे और सलाख़ों के पीछे जाएँगे। pic.twitter.com/IPFE7Uky0x
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 16, 2023
अलीकडेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांची मुलगी वामिकाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. त्यांनी मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यावर काही युजर्सनी अश्लील कमेंट केल्या होत्या. याआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याची मुलगी झिवा तसेच रोहित शर्माची पत्नी व मुलीबाबत काही लोकांनी अशाच प्रकारे कमेंट केलेल्या. यापूर्वी देखील धोनीच्या मुलीला जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आलेली. त्याप्रकरणी एका व्यक्तीला उत्तर प्रदेश येथून अटक केली गेलेली.
जिस तरह कोहली और धोनी की बच्चियों के बारे में भद्दी टिप्पणियाँ ट्विटर पर की जा रही हैं उसी तरह #RohitSharma की पत्नी और बच्ची को भी अभद्रता का निशाना बनाया जा रहा है। चल क्या रहा है ये ? @Delhipolice @MumbaiPolice pic.twitter.com/dZHKz5BD9A
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 12, 2023
स्वाती मालीवाल यांच्या ट्विटनंतर दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने तक्रार दाखल करून घेतली. तसेच, ट्विटरवरून लवकरच या सर्व खात्यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देत नोटीस पाठवण्यात आली आहे.
(Delhi Police Issue Notice From Twitter After Abusing Words For Dhoni Virat And Rohit Daughters)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: विराटने धोनीच्या अंदाजात गाजवलं मैदान; ‘तो’ पॉवरफुल फटका मारताच समालोचकही म्हणाले, ‘माही शॉट’
सेंच्युरीनंतर विराटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव, पण अनुष्काच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली…