---Advertisement---

कॅरेबियन क्रिकेटला सोन्याचे दिवस आणण्यासाठी बोर्डाने कसली कंबर! दिग्गजाकडे दिली मोठी जबाबदारी

On: शुक्रवार, जानेवारी 7, 2022 4:11 PM
windies
---Advertisement---

एकेकाळी याच्या क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडीज क्रिकेट संघाची सध्या दुर्दशा झाली आहे. दोन वनडे विश्वचषक व दोन टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला आगामी टी२० विश्वचषकात पात्रता फेरी खेळावी लागेल. त्याचवेळी आता या सततच्या खराब कामगिरीमुळे वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (West Indies Cricket Board)

वेस्ट इंडिजचे माजी सलामीवीर डेस्मंड हेन्स (Desmond Haynes) यांच्याकडे आता वेस्ट इंडीज संघाच्या निवड समितीची धुरा देण्यात आली आहे. ते रॉजर हार्पर यांची जागा घेतील. हेन्स यांची ही नियुक्ती ३० जून २०२४ पर्यंत असेल. त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन टी२० विश्वचषक व एका वनडे विश्वचषकासाठी संघाची निवड केली जाईल. निवड समितीचे माजी अध्यक्ष हार्पर हे २०१९ पासून या पदावर कार्यरत होते. (West Indies Cricket Selection Committee)

मुख्य निवडकर्तो म्हणून नियुक्ती झाल्यानंतर हेन्स यावर प्रतिक्रिया देताना म्हटले,
“मी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट आणि क्रिकेट वेस्ट इंडिजच्या संचालक मंडळाचे आभार मानतो. निवडकर्ता बनणे हे क्रिकेटमध्ये कृतज्ञतेचे काम आहे. ही नक्कीच अभिमानाची गोष्ट वाटते.”
हेन्स यांनी ८० व ९० च्या दशकात तब्बल सोळा वर्ष वेस्ट इंडीजसाठी क्रिकेट खेळले होते. त्यांनी संघासाठी ११६ कसोटी व २३८ वनडे सामने खेळले आहेत.

वेस्ट इंडीज संघाची सातत्याने खराब कामगिरी
वेस्ट इंडीज संघाने २०१६ मध्ये भारतात झालेला टी२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर, संघ सातत्याने खराब कामगिरी करत आहे. २०१९ वनडे विश्वचषक तसेच २०२१ टी२० विश्वचषकात संघाला पहिल्या फेरीच्या पुढे जाता आले नाही. तसेच, अनेक द्विपक्षीय मालिकांमध्येही संघ विजय मिळवू शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटने केपटाऊन कसोटीत पुनरागमन केल्यास ‘या’ दिग्गजाला प्लेइंग इलेव्हनमधून द्या डच्चू, गंभीरचा सल्ला (mahasports.in)

‘तरीही मला का संधी नाही? खुप वाईट वाटतंय!’ भारताच्या विश्वचषक संघात निवड न झाल्याने ‘ती’ प्रचंड नाराज (mahasports.in)

मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘या’ कारणामुळे बीसीसीआय आयपीएल २०२२ चे सर्व सामने मुंबईत खेळवण्याच्या विचारात (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---