बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताच्या ईशान किशन याने इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा ईशान किशन चौथा भारतीय ठरला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ईशान किशन याचे अलिशान आयुष्य, मिळकत व एकूण संपत्ती आणि त्याच्या जर्सीमागील क्रमांमागे असलेले गुपित.
जर इशान किशन याच्या जर्सीच्या क्रमांकाविषयी बोलायचे झाले तर, त्याचा जर्सी क्रमांक 51 हा आहे. याबद्दल मुंबई इंडियन्स संघाने एक व्हिडीओ प्रसारीत केला होता, ज्यात त्याने या गोष्टीचा उलगडा केला. या व्हिडीओत त्याने सांगितले की त्याने जर्सीचा क्रमांक आपल्या आईच्या सांगण्यावरुन घेतली होता.
ईशान किशनची संपत्ती
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी खेळण्याआधी तो गुजरात लायंस या संघासाठी खेळला होता. गुजरात लायंस संघ बाहेर पडल्यानंतर तो मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. एका अहवालानुसार ईशान किशन याची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये इतकी आहे
ईशान किशन याचे वार्षिक उत्पन्न जवळपास 7 कोटी सांगण्यात येत आहे. 2016च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने किशनला 3.50 लाख रुपयात खरेदी केले होते, त्यानंतर 2018च्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला 6.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. तसेच 2022मध्ये किशनची किंमत 15.25 कोटी रुपये इतकी झाली.
याचबरोबर ईशान अलिशान आयष्य देखील जगत असतो,. त्याच्याजवळ कोट्यावधी रुपयांच्या गाड्या, महागडी घड्याळे आणि घर आहेत. जर गाड्यांविषयी बोलायचे झाले तर, त्याच्याकडे 72 लाख रुपयांची बीएमडब्ल्यु 5 सिरीज, 92 लाख रुपयांची फोर्ड मस्टांग आणि 1.05 कोटी रुपयांची मर्सिडीझ बेंझ सी-क्लास आहे.
ईशान किशन याचे घर-
पटना येथे ईशान किशन याचे अत्यंत सुंदर आणि अलिशान घर आहे. रियल इस्टेटच्या व्यवसायात देखील त्याची गुुंतवणुक आहे.(Details about Ishan Kishan’s life style, vehicle collection, net worth and luxury house)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जे गेल अन् सेहवागलाही नाही जमलं, ते 24 वर्षांच्या किशनने करून दाखवलं; बातमी वाचाच
सत्य पचवणे रिकी पाँटिंगसाठी कठीण! विराट कोहलीने मोडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा विक्रम