भारतीय संघाकडे गुणवंत खेळाडूंची कसलीही कमी नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंव्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना अद्याप राष्ट्रीय संघात संधी मिळालेली नाही. सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची रणजी ट्रॉफी खेळली जात आहे. अशात कर्नाटक संघाच्या एका फलंदाजाने असे प्रदर्शन केले आहे, जे पाहून त्याला लवकरच राष्ट्रीय संघात संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक फलंदाज असा आहे, जो त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर सर्वांच्या मनात स्थान निर्माण करत आहे. आयपीएलमध्ये मागच्या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी तुफानी प्रदर्शन करणारा देवदत्त पड्डीकल (Devdatt Padikkal) याने रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटक संघासाठी जबरदस्त खेळी केली आहे. कर्नाटक आणि पद्दुचेरी या संघामध्ये झालेल्या सामन्यात पड्डीकलने शतकी खेळी केली, हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक होते.
कर्नाटक संघाचे फलंदाज रविकुमार समर्थ आणि करूण नायर अनुक्रमे ११ आणि ६ धावा करून बाद झाले. पण सलामीसाठी आलेला पड्डीकल खेळपट्टीवर टिकून राहिला आणि १७८ धावा ठोकल्या. कृष्णमूर्ती सिद्धार्थने पड्डीकलचा चांगली साथ दिली आणि वैयक्तित ८५ धावा केल्या. पड्डीकलच्या या तुफानी शतकानंतर भारतीय संघात (Team India) त्याला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
मागच्या आयपीएल हंगामात देवदत्त पड्डीकल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्व करत होता. त्याने १३ हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये ४११ धावा केल्या, पण यावर्षी त्याच्या बॅटमधून एकही शतक आले नाही. आयपीएलमधील त्याच्या एकंदरित कामगिरीचा विचार केला, तर त्याने आतापर्यत २९ सामने खेळले आणि यामध्ये ८८४ धावा केल्या आहेत. त्याला यापूर्वी २०२१ मध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी मिळाली होती. त्यामुळे त्याचे टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणही झाले. मात्र, त्यानंतर त्याला भारतीय संघात अद्याप संधी मिळालेली नाही.
आयपीएल २०२२ मध्ये तो राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याच्या ७.७५ कोटी रुपयांची बोली लावली आणि त्याला संघात सामील केले. मेगा लिलावात पड्डीकलने स्वतःची बेस प्राइस २ कोटी रुपये ठेवली होती. पण त्याची गुणवत्ता लक्षात घेऊन राजस्थान संघाने त्याच्यावर बेस प्राइसपेक्षा तीन पट बोली लावली आणि संघात सामील केले. आगामी आयपीएल हंगामात पड्डीकलचा चांगला फॉर्म कायम राहिला, तर भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले जाऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या –
माही वे! आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होताच धोनीने सुरू केला सराव; फोटो होतोय जोरदार व्हायरल
जरा इकडे पाहा! आठ गोलांनंतरही गोवा अन् केरलामधील सामना सुटला बरोबरीत
आयपीएल २०२२मधून धोनीचा पत्ता होणार कट? ‘हा’ खेळाडू सांभाळू शकतो चेन्नईची धुरा